Announcement

Collapse
No announcement yet.

NRC, CAA आणि नागरिकांचे स्वातंत्र्य आणि भारतीय राष्ट्राची संकल्पना

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • NRC, CAA आणि नागरिकांचे स्वातंत्र्य आणि भारतीय राष्ट्राची संकल्पना

    NRC आणि CAA या दोन गोष्टी भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य आणि राष्ट् या संकल्पनेला तडा देणारे का आहेत हे मी थोडक्यात समजावून सांगतो.

    १९५१ साली भारताने भारतीय नागरिकत्व कायदा केला. या कायद्या नुसार भारताचे नागरिक कोणाला म्हणता येईल याची मूळ व्याख्या केली. अर्थातच त्या कायद्यात १९४७ च्या फाळणीचे प्रतिबिंब पडले आणि त्यानुसार त्यातून पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्वापासून वगळण्यात आले. त्यानंतर १९८६, १९९२, २००३, २००५, आणि आता २०१९ अश्या ५ दुरुस्त्या केल्या गेल्या. त्यापैकी २००३ च्या दुरुस्ती नुसार केंद्र सरकारला NRC म्हणजे राष्ट्रीय नागरिक यादी बनवण्याचा अधिकार प्राप्त झाला. आणि २०१९ च्या दुरुस्तीनुसार शेजारी मुस्लिम देशातील गैरमुस्लिम अल्पसंख्यांकाना भारतात नागरिकत्व देण्याचा कायदा तयार झाला.

    खरे तर या दुरुस्त्या दुरुस्त्या कमी आणि ना-दुरुस्त्या जास्त आहेत. कसे ते आपण पाहू.
    १) नागरिकत्व सूची (NRC)
    २००३ ची हि भाजपाची कल्पना २००४-२०१९ मध्ये मनमोहन आणि मोदी या दोघांनी राबवली नाही. दुर्दैवाने भारतात लोकशाही बळकट नसल्यामुळे नागरिकांचा पुरेसा सहभाग न घेता हे सर्व कायदे आणि दुरुस्त्या केल्या गेल्या आहेत. Nrc सारखी गोष्ट जगात कोणत्याही प्रगत देशात अस्तित्वात नाही कारण अशी सूची केली कि सरकार तुमच्या नागरिकत्वालाच आणि पर्यायाने अस्तित्वाला च आव्हान देऊ शकते. त्यामुळे प्रगत देशात वेगवेगळ्या पद्धतीच्या नोंदणी अस्तित्वात असतात परंतु नागरिकत्व नोंदणी ला प्रचंड विरोध असतो. भारता सारख्या देशात सरकार आणि प्रशासन आणि न्याय व्यवस्था मुळातच भ्रष्ट आहेत आणि त्यात NRC मुले नागरिक आणि विरोधकांची मुस्कटदाबी अजूनच वाढेल यात काहीच संशय नाही. Nrc मुले घुसखोरी कमी होईल आणि सुरक्षा वाढेल असा तर्क केला जातो. पण त्यात काही तथ्य नाही. सर्वात जास्त घुसखोरी आसाम मध्ये आहे असा समज होता तिथे सुद्धा फक्त २० लाख घुसखोर सापडले. त्यात देखील 80% हिंदूच होते. त्यामुळे संपूर्ण भारतात १ कोटींच्या वर घुसखोर असण्याची शक्यता शून्य आहे. ज्या देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे तिथे १ कोटी घुसखोर काय करणार? पोटापाण्याचा उद्योग करणार कि दंगा? दंगा तर बहुतांशी राजकीय नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचाच असतो. त्यामुळे NRC ची मूळ कल्पनाच चुकीच्या मुस्लिम विरोधी मानसिकतेतून आली आहे हे सिद्ध होते. १ कोटी घुसखोरांची नाकेबंदी करून भारतीय नागरिकांची सुरक्षितता वाढणे सोडा १३० कोटी भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य मात्र नक्की कमी होईल.

    २) २०१९ ची नागरिकत्व दुरुस्ती (CAA)
    २०१९ मध्ये मोदी शहा सरकारने नागरिकत्व दुरुस्ती करून शेजारी मुस्लिम राष्ट्रांमध्ये गैर मुस्लिम नागरिकांचा छळ होतो असे म्हणत त्यांना आश्रय आणि भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद केली. परंतु त्यापासून मुस्लिम व्यक्तींना वगळले. खरे पाहता मुस्लिम धर्म म्हणजे सुद्धा एकजिनसी नाही. पाकिस्तानात मोहजीर म्हणजे भारतातून गेलेले मुस्लिम यांचा मोठा छळ होतो. शिया पंथियांचा छळ होतो. अहमदिया लोकांचा छळ होतो. त्यामुळे मुस्लिम लोकांचा सुद्धा छळ होऊ शकतो. बरे छळ हा प्रत्येक वेळी धार्मिक असेल असेही नाही. जिथे लोकशाही दृढ नाही तिथे राजकीय छळ होऊ शकतो. त्यामुळे शेजारी राष्ट्रांबद्दलचे हे "अल्पसंख्यांक" प्रेम हे भाजपच्या स्वार्थातून आलेले आहे. त्यात कोणतीही मूल्ये नाहीत किंवा दूरगामी विचार नाही. भाजप भारतीय राष्ट्राची संकल्पना धर्मावर आधारु पाहतो आहे. आणि ते 100% चूक आहे. आधुनिक राष्ट्रे ही माणसांवर आधारित आहेत धर्मावर नाही. अमेरिका फ्रांस रशिया चीन जपान जर्मनी इंग्लंड हि सर्व प्रगत राष्ट्रे धर्माला मागे टाकून व्यक्ती स्वातंत्र्य आणि हक्क यांचा पुरस्कार करतात म्हणून श्रीमंत आहेत. त्यामुळे धर्मावर आधारित नागरिकत्व दुरुस्ती ही कल्पना भारतीय राष्ट्राला पोषक नाही.

    खरे तर NRC आणि CAA दोन्ही गोष्टींचा नीट विचार केला तर दोन्ही मध्ये मुस्लिम लोकांची भाजप ला वाटणारी भीती आहे. आणि त्यातून हिंदू मतांचा गठ्ठा तयार करणे हे सूत्र आहे.

    भारताची फाळणीच मुळी मुस्लिम भीतीतून निर्माण झाली. मुस्लिम आणि मराठा या देशाचे शासक होते. इंग्रजांनी भारत देश मुस्लिम आणि मराठ्यांकडून घेतला. त्यामुळे इंग्रजांनी मुस्लिम आणि मराठा दोन्ही शासकांना जितके ठोकत येईल तितके ठोकले आणि स्वतः:ला धार्जिणा असा प्रशासकीय कारकून वर्ग तयार केला. हा कारकून वर्ग इंग्रज गेल्यावर आपले काय होणार म्हणून घाबरला आणि म्हणून भारताची फाळणी झाली. भारत पाकिस्तानच्या १० पट मोठा आहे. आणि भारताने पाकिस्तानला घाबरण्याचे काही कारण नाही. परंतु पाकिस्तान ला धोपटले कि आपली सत्ता बळकट होते म्हणून पाकिस्तानला धोपटले जाते. अतिरेकी कारवाया आणि मुस्लिम दहशतवाद यामुळे हे धोपटणे खूपच सोपे झाले आहे. परंतु दहशत वाद हा केवळ भारत पाकिस्तान विषय नाही. अमेरिका आणि इतर राष्ट्रे आणि त्यांची विनाशकारी शस्त्रे आणि त्यांचे जागतिक खेळ हा खरा विषय आहे. पाकिस्तान हे केवळ एक प्यादे आहे.

    परंतु आपण ते विचारात न घेता पाकिस्तान आणि बांगला देश यांच्या शी भांडत बसलो तर आपणच या जागतिक खेळातील एक प्यादे बनून जाऊ. आणि म्हणूनच पाकिस्तान किंवा मुस्लिमांची भीती न बाळगता आणि त्याचे राजकीय भांडवल न करता भारताने NRC आणि CAA सारख्या गोष्टी दूर सारल्या पाहिजेत. किंबहुना भारताने आपली प्रगती साधताना शेजारी राष्ट्रांना यांना बरोबर घेतले पाहिजे. कारण आपण ते केले नाही तर चीन नक्की करेल. नेपाळ आणि श्रीलंका मध्ये ते सध्या मोठ्या प्रमाणावर घडते आहे.

    भाजप संघ आणि इंग्रजांचा कारकून वर्ग सर्व जण चोर चोर मोसेरे भाई आहेत. त्यांची धर्मधिष्टित विचारसरणी हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे

Working...
X