Announcement

Collapse
No announcement yet.

मध्यमवर्गाच्या अतिरेकी विचारसरणीचा धोका

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • मध्यमवर्गाच्या अतिरेकी विचारसरणीचा धोका

    काल आयसिस चा मुख्य अतिरेकी अबूबकर अल-बगदादी याला अमेरिकेने ठार मारलं. अल-बगदादी ला मारल्यामुळे मोहोर फुटून भारतीय मुस्लिमांना शिव्या देणाऱ्या काही पोस्ट पहिल्या म्हणून हे लिहावेसे वाटले.

    जगाच्या इतिहासात दहशतवाद एक राजकारणाचे शस्त्र म्हणून वापरले गेले आहे. सोयीस्कररीत्या दहशतवादाची निर्मिती होते आणि सोयीस्कररीत्या त्याचे उच्चाटन होते. धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक वांशिक किंवा इतर कोणत्याही पद्धतीने कट्टर लोकांना चिथावणी देऊन राष्ट्रे अस्वस्थ आणि नंतर उध्वस्त केली जातात. कट्टरता वाद हा अस्मितेच्या रूपात जन्माला येतो, असहिष्णुतेच्या तारुण्यात पदार्पण करतो, मध्यम वयात भ्रष्टाचाराला आणि हिंसाचाराला देशकार्य समजले जाते आणि वार्धक्यात सर्वनाश बनतो. तोपर्यंत सर्वच नष्ट झालेले असते. इराक एकेकाळी अरब जगात सर्वात जास्त प्रगत देश होता. सद्दाम समाजवादाच्या प्रभावित नेता होता. परंतु आज त्या देशात शिया सुन्नी भांडणे सहजगत्या लावून त्यांचा सर्वनाश केला गेला आहे.

    हिंदुत्ववादी हे फार तर कट्टर असतात ते कोणाचे गळे कापत नाहीत म्हणून हिंदुत्व देशाला घातक नाही असा आपल्याकडे एक आवडता भ्रम आहे. परंतु ते खरे नाही. केवळ ५ वर्षात भारताने अनेक विचारवंतांच्या आणि मुस्लिमांच्या हत्या पाहिल्या, भाषण स्वातंत्र्याची गळचेपी अनुभवली, डेमोनेटीझशन सारखे तुघलकी निर्णय झेलले, दारिद्य निर्देशांकाची अधोगती पाहिली, सरकारी संस्थांचा सर्रास राजकीय फायद्यासाठी गैरवापर सुद्धा पाहिला. ही फक्त सुरुवात आहे. जर भारतीयांनी विकासाचा सहिष्णुतेचा आणि उदारमतवाद (लिबरल थॉट) यांचा आग्रह धरला नाही तर याहून परिस्थिती अधिक गंभीर बिघडू शकते. देशाला खरा धोका अल्पसंख्यांकांपासून कधीच नसतो. देशाला खरा धोका हा मध्यमवर्गाच्या अतिरेकी विचारसरणीपासून असतो.
Working...
X