Announcement

Collapse
No announcement yet.

नथुराम गोडसे - पहिला हिंदू अतिरेकी?

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • नथुराम गोडसे - पहिला हिंदू अतिरेकी?

    कमल हसन ने नथूराम पहिला हिंदू अतिरेकी होता असे म्हटले आहे. त्यावर पब्लिक चिडलेले दिसते आहे.

    मला प्रश्न पडला आहे कि तो पहिला होता हे चूक कि अतिरेकी होता हे चूक कि हिंदू होता हे चूक?

    नथुराम अतिरेकी होता यात काहीच संशय नाही कारण त्याने गांधीजींची हत्या द्वेषापोटी केली. त्याचे गांधीजींशी वैचारिक मतभेद होते हे मला खरे वाटत नाही. फाळणीला जबाबदार नेहेरु आणि काँग्रेस पक्षातील हिंदू नेते होते परंतु हत्या त्याने गांधीजींची केली. ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचे गांधीजींशी कोणतेही वैचारिक मतभेद होते यावर माझा विश्वास नाही. गांधीजींचे राजकारण इतक्या वरच्या दर्जाचे (sophisticated) होते कि ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळत नसे कि गांधीजींशी कसे वागायचे आणि ते त्यांचा द्वेष करत असत. सत्य आणि अहिंसा ही तत्वे गांधीजींनी राजकीय संगठन करण्यासाठी अतिशय प्रभावीपणे वापरली. ब्रिटिशांना गांधीजींविरुद्ध हिंसा वापरता येईना. परंतु नथुराम मध्ये द्वेष ओतप्रोत भरला होता आणि त्याला गांधीजींचे मोठेपण कधीच कळले नाही. त्यातून हिंसा उत्पन्न झाली. आजही बऱ्याच भोन्दुत्ववादी लोकांना नथुराम चे कृत्य समर्थनीय वाटते.

    असो .. तर नथुराम अतिरेकी होता हे नक्की. तो हिंदुत्ववादी होता हे देखील नक्की त्यामुळे हिंदू अतिरेकी होता हे देखील नक्की.

    नथुराम पहिला हिंदू अतिरेकी होता का ? तर मित्रो .. ... तो पहिला नक्कीच नव्हता.

    तो मान कदाचित चापेकर बंधूंना द्यायला हवा कारण त्यांनी रँड ची हत्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नाही तर धर्म भ्रष्ट केल्याबद्दल आणि देवांच्या मूर्ती तोडल्याबद्दल केली (दामोदर हरी चापेकर यांचे हे शब्द आहेत). इंग्रज परकीय राज्यकर्ते होते त्यामुळे त्यांच्या बद्दल सहानुभूती असण्याचा प्रश्नच नाही. परंतु प्लेग आटोक्यात आणणे म्हणजे काही जुलूम नाही. प्लेग आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी पुण्यात जे "जाचक" नियम घातले आणि जबरदस्ती केली त्याने धर्म भ्रष्ट झाला अशी या लोकांची तक्रार होती.धर्माचे खूळ डोक्यात बसलेल्या लोकांना हे कधी समजणार कि ब्रिटिशांनी त्यावेळी जी पावले उचलली ती पुण्यात पब्लिक हेल्थ क्रायसिस झाला म्हणून उचलली.?

    मारा गोळी.

    This assassination was absolutely in the same league as with Gandhi, Dabholkar, and Lankesh assassination. All in the name of Hindu religion and Hindu Rashtra.

    पुढे चापेकर बंधूंचे कृत्य हे राष्ट्रकार्य आहे असे आपल्याला सांगण्यात आले आहे आणि आपण ते मेंढरांप्रमाणे स्वीकारतो. परंतु थोडे जरी डोके वापरले तर हे लक्षात येईल कि धर्म आणि धर्माधिष्टीत राष्ट्र यांच्या नावाखाली केलेली हि सर्व अतिरेकी कृत्ये आहेत. त्यात सामान्य माणसाचा काहीही विचार नाही.
Working...
X