Announcement

Collapse
No announcement yet.

आरक्षणाची गरज आणि महत्व

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • आरक्षणाची गरज आणि महत्व

    कुठलेही आरक्षण कशासाठी असते? दोन पद्धतीचे भेदभाव समाजात असतात. एक डोळ्याला दिसणारा आणि दुसरा न दिसणारा. हे भेदभाव गुणवान लोकांकडून संधी हिरावून घेतात. भेदभाव कधी जाती पातीचे असतात, तर कधी प्रांताप्रांताचे. कधी स्त्री विरुद्ध तर कधी राजकीय मतांचे. कधी रंग रूप तर कधी शारीरिक व्याधी किंवा कमतरतेवर आधारित. कधी सामाजिक तर कधी आर्थिक परिस्थितींमुळे सुद्धा गुणवान लोक मागे राहू शकतात.

    सर्व माणसांमध्ये काही ना काही गुणवत्ता असते. तिला संधी मिळणे आवश्यक असते. सुदैवाने निसर्ग गुणवत्ता सगळीकडे सारखी पेरतो. जिथे त्या गुणवत्तेला संधी मिळते ती भूमी समृद्ध आणि श्रेष्ठ होते. जगात जशी अमेरिका सर्वश्रेष्ठ आहे तसेच भारतात महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ आहे. याचे कारण जगात अमेरिकेत सर्वात कमी भेदभाव आहे. आणि भारतात महाराष्ट्रात सर्वात कमी भेदभाव आहे.

    आरक्षण दूर केले तर भेदभाव आपोआप जातील का? आरक्षण असूनही राखीव जागा भरल्या जात नाहीत हे वास्तव आहे. शिक्षण संपल्यानंतरही नोकरी आणि पुढील पदोन्नती मध्ये गुणवान मागास वर्गीयांवर अन्याय होताच राहतो. मराठा लोक आर्थिकदृष्टया शेतीवर अवलंबून असल्यामुळे मागे पडले आहेत आणि त्यांच्यावर देखील अलिखित अन्याय होतो. मुस्लिम समाजाची व्यथा देखील कमी नाही. ३०% लोकसंख्येचे प्रमाण असून मराठा लोक नोकऱ्यांमध्ये ३०% दिसत नाहीत. उच्च पदांवर तर मुळीच नाही. मुस्लिमांचे प्रमाण त्याहून देखील कमी आहे. दलितांना जर संधी कुठे मिळत असेल तर ती फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये. आज सरकारी नोकऱ्यां पेक्षा खाजगी नोकऱ्या कित्येक पटींनी अधिक आहेत. तिथे होणार भेदभाव आपण कसा रोखणार.

    आरक्षणाला विरोध जरूर करा. परंतु अन्यथा सर्वाना सामान संधी कशी प्राप्त करून देणार हे जरूर समजावून घ्या. भेदभाव नष्ट कसे करणार हे सांगा. ज्या दिवशी भारतातील मोठमोठ्या कंपन्यांचे ५०% ceo दलित आणि obc असतील, ज्यावेळी ३०% मराठा असतील, १२% मुस्लिम असतील, आणि ५०% स्त्रिया असतील त्यावेळी भेदभावाचे समूळ उच्चाटन झाले असे म्हणता येईल. परंतु खरे सांगायचे तर अमेरिकेत देखील इतकी आदर्श परिस्थिती नाही. त्यामुळे तसे ध्येय कदाचित वेडगळ ठरेल. परंतु आपण त्याच्या निम्या संख्येचे उद्दिष्ट नक्कीच ठेऊ शकतो. २५% कंपन्यांचे प्रमुख दलित, २५% स्त्रिया, १५% मराठा, ६% मुस्लिम ... हे तर शक्य आहे ना? जर सर्वोच्च ठिकाणी भेदभाव कमी झाला तर इतर सर्व ठिकाणी कमी होईल.

    कधी कधी वाटते भारतातील समाजशास्त्र संस्था काही विचार करतात कि नाही. इतका साधा विचार त्यांना ७० वर्षात का नाही सुचला? कारण साधे आहे .. त्या संस्था सुद्धा आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहेत. त्यातील काही महाभागांना भारतीय समाजातील जातीभेद अन्यायकारक आहेत हेच मान्य नाही. त्यांच्या लेखी भारताच्या अधोगतीचे कारण मुस्लिम आक्रमणे आहेत. त्याइतका निर्बुद्ध आणि ढोंगी विचार दुसरा नाही. भारतातील मनुष्यबळ जातीपद्धतीमुळे अविकसित राहिले आहे. अविकसित मनुष्यबळामुळे भारत गरीब आहे. राज्य जिंकणे हरणे साम्राज्य विस्तार हे कर्तृत्ववान लोक करतात.ते मुस्लिमांनी केले, इंग्रजांनी केले, फ्रेंच, पोर्तुगीज, शक, हुन, गुप्ता, मौर्य, मराठा, राष्ट्रकूट, चोल, पांडियन आणि अनेक साम्राज्यांनी केले. केवळ मुस्लिमांवर आरोप करणे हा देशद्रोह आहे.

    हिंदू धर्म आणि समाजामधील विकृती या मुस्लिमांमुळे नाहीत. आपण आपल्या चुकांना ओळखले पाहिजे आणि भविष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी अविकसित घटकांना जाणीवपूर्वक संधी दिली पाहिजे.
Working...
X