Announcement

Collapse
No announcement yet.

संपत्ती

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • संपत्ती

    भारतासारखा महाकाय देश महासत्ता व्हावा ही तुमची आमची सर्वांचीच इच्छा. शाळा कॉलेजामध्ये असताना राष्ट्रवादी विचारसरणीने भारून जाऊन बरीच स्वप्ने आपण पाहतो. त्यानंतर वर्षे आणि दशके उलटतात. मागे वळुन बघता भारताची प्रगती बरीच झाली असली तरीही तुलनात्मकरीत्या अजूनही आपण गरीबच आहोत. भारत आज युरोप पेक्षा कमीत कमी २० पट आणि अमेरिकेपेक्षा ३० पट गरीब आहे. ५० वर्षांपूर्वी आपल्या बरोबरीला असणारा चीन भारतापेक्षा ५ पट श्रीमंत झाला आहे.



    दक्षिण कोरिया आणि चीन हे भारताच्या बरोबरीला असलेले देश ७० वर्षानंतर गरीब वर्गातून सुखवस्तू वर्गात गेले आहेत. जपान जर्मनी आणि युरोपमधील दुसऱ्या महायुद्धात उद्धवस्त झालेले देश पुन्हा एकदा श्रीमंत आणि प्रगत झाले आहेत. भारत अजूनही गरीब का? अजूनही १८% लोकांना पुरेसे अन्न आणि वस्त्र मिळत नाही. २/३ शहरी व्यक्तींना स्वतः:चे घर नाही. २/३ ग्रामीण घरात शौचालये नाहीत. आपली किमान गरज आहे इतकी वीज आपण अजूनही तयार करू शकत नाही. प्रगत देशांच्या आपण १०-२०% च वीज आपण वापरतो.

    भारत नेहेमीच इतका गरीब होता का? मुळीच नाही. अगदी मुस्लिम आक्रमणांनंतरदेखील भारत असा दरिद्री मुळीच नव्हता. इंग्रजांच्या राज्यात भारतातील पहिला दुष्काळ बंगाल मध्ये पडला १७७० साली. अमर्त्य सेन त्याला मानव निर्मित दुष्काळ म्हणतात. नवाब सिराज-उद्दोला ला हरवून ईस्ट इंडिया कंपनी ने बंगाल चे करवसुली (सारावसुली ) चे हक्क मिळवले. कंपनीने १०% सारा वसुली ५०% पर्यंत वाढवली आणि त्यामुळे दुष्काळ पडला आणि १ कोटी लोक (बंगाल ची त्यावेळची १/३ लोकसंख्या) मृत्युमुखी पडली. १९४३ मध्ये पुन्हा बंगाल मध्ये दुष्काळ पडला. त्यावेळी झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे ग्रामीण जनतेची क्रयशक्ती घटली आणि पुन्हा एकदा ३० लाख लोक मृत्यू पावले.

    वसाहतवाद लुटीवर आधाराला असल्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतात गरिबी वाढली. परंतु इंग्रजांनी भारताचे सर्वात जास्त नुकसान केले ते कारकून वर्ग तयार करून आणि कारकून वर्गाच्या हाती सत्ता सोपवून.इंग्रजांनी केलेली राज्यपद्धती आणि कायदे स्थानिक जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केले होते, जनतेचे कल्याण करण्यासाठी नव्हे. १९४७ नंतर स्वातंत्र्य मिळुनही कारकून वर्ग त्याच पद्धतीने भारतीय जनतेवर राज्य करत आहे. स्थानिक सत्ताधीश आणि राजे यांना डावलल्यामुळे कारकून वर्गावर इंग्रजांनंतर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे भ्रष्टाचार अमर्यादित वाढला.

    जोपर्यंत सामान्य जनता हा कारकून वर्ग झुगारून देत नाही तोपर्यंत भारत केवळ गरीबच नाही तर दयनीय अवस्थेत राहणार.

    भारताच्या सद्यःपरिस्थितीचे हे मुख्य कारण असले तरीही इतरही अनेक कारणामुळे आपल्याकडे संपत्तीची निर्मिती हवी तेवढी होत नाही.

    संपत्ती आणि पैसे यामध्ये फरक आहे. आपण आज वापरतो तो पैसा. आणि भविष्यासाठी साठवतो ती संपत्ती. समाजात संपत्ती तयार करण्यासाठी चार मुलभूत गोष्टींची आवश्यकता असते.
    १) कायदा, सुव्यवस्था, आणि न्याय
    २) स्वातंत्र्य आणि व्यक्तीगत मालमत्ता अधिकार
    ३) बाह्य शत्रूंपासून संरक्षण
    ४) समानता

    काही जण म्हणतील स्पर्धा ज्ञान आणि नावीन्य सुद्धा असायला हवे. ते खरे आहे. परंतु माझ्या मते स्पर्धा आणि नावीन्य या चार गोष्टींचा परिपाक आहेत. त्याचा उहापोह पुढे करू.

    भारतात महाराष्ट्र सर्वाधिक संपन्न राज्य आहे. निम-वाळवंटी प्रदेश असूनही भारतात महाराष्ट्र उत्पन्न , कर , निर्यात आणि गुंतवणूक या सर्व गोष्टींमध्ये अग्रेसर आहे. हा केवळ योगायोग नाही. महाराष्ट्र पुरोगामी आहे. संपत्ती निर्माणच्या ४ पैकी ३ निकषांवर सर्वोत्कृष्ट असल्यामुळे महाराष्ट्र अग्रेसर आहे. (संरक्षण हा राज्याचा विषय नाही. म्हणून तिथे तुलना करू शकत नाही.) आणि यामध्ये मराठी समाज, संस्कृती, इतिहास आणि राजकीय नेतृत्वाचे मोलाचे योगदान आहे. मारवाडी गुजराती पंजाबी आणि सिंधी लोक भारतात जसे मुंबईत आणि पुण्यात आले तसे ते दिल्ली कलकत्ता मद्रास आणि इतर राज्यातही गेले. परंतु त्यांच्या गुणांना खरा वाव मिळाला तो महाराष्ट्रामध्ये. याचा मराठी लोकांना अभिमान वाटायला हवा.

    ज्या गुणांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाली त्या गोष्टी उर्वरित भारतात कमी आहेत. त्यामुळे उर्वरित भारतात संपत्तीनिर्माण करायला पोषक वातावरण नाही.

    २०१३ मध्ये मोदी सरकार निवडून आले तेव्हा मोदींचा विकासावरचा भर पाहून चांगले वाटले होते. ९० च्या दशकापासू पासून आर्थिकदृष्ट्या भारत योग्य मार्गावर आला होता असे चित्र होते. परंतु मागील ५ वर्षात धार्मिक उन्माद, द्वेष आणि हुकूमशाही वाढत चालली आहे. स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय. धादांत खोटेपणा राष्ट्रभक्ती म्हणून विकला जात आहे. भारतासारख्या गरीब देशाला हे परवडणारे नाही. गरिबीमुळे अगतिकता वाढते, उमेद कमी होते आणि अस्थिरता वाढते. हे व्यक्ती आणि समाज दोघांना लागू आहे. भारताचे प्राधान्य संपत्ती निर्माण असले पाहिजे.

    मराठी समाजातील पुरोगामी विचार भारतात प्रसृत केले पाहिजेत. इंग्रजांनी पोषण केलेला कारकून वर्ग प्रतिगामी आहे. त्या वर्गाच्या मगरमिठीतून सुटका होण्याऐवजी हिंदुत्वाच्या नावाखाली प्रतिगामी विचारांचा विळखा आवळला जातो आहे.

    याचा संपत्तीनिर्माण करण्यावर विपरित परिणाम मागील ७० वर्षे झाला आहे आणि तो अजूनच वाढणार आहे. मूठभर निर्बुद्ध लोकांच्या नकली राष्ट्रवादापासून सुटका करून संपुर्ण समाजाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधणारा विचार आणि आचार घट्ट करण्याची आवश्यकता आहे.

    मराठी लोकांनी पुरोगामी विचार सोडून प्रतिगामी विचारांची कास धरणे भारतासाठी मोठे संकट आहे. आणि ते संकट टाळणे हे प्रत्येक अस्सल मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
Working...
X