Announcement

Collapse
No announcement yet.

९७ कुळी म्हणजे काय?

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • ९७ कुळी म्हणजे काय?

    ९७ कुळी या ब्लॉग मधील हे पहिले पुष्प. या ब्लॉग मधून इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या वाटेला जाण्याचा विचार आहे. उद्देश साधा आहे. महाराष्ट्र आणि भारत समृद्ध होवो आणि भारत जगाला मार्गदर्शक देश होवो.

    ९७ कुळी हा सर्वप्रथम एक विचार आहे, त्या विचाराला मानणारा समाज आहे आणि त्या समाजाला दिशा देणारा एक विचारमंच आहे. विद्रोही संत आणि समाज सुधारकांच्या ७०० वर्षांच्या कार्यामुळे आज आपले सर्वांचे एकच कूळ आहे आणि ते म्हणजे ९७ वे कूळ. आपापली कुळे आणि जाती पाती मागे टाकून आपण सर्वांनी महाराष्ट्राचे आणि देशाचे ९७ वे कूळ बळकट करण्याची आज महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला गरज आहे. समता आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्राचा संदेश भारतभर नेण्याची आवश्यकता आहे.

    महाराष्ट्र भारतात एक आगळे वेगळे राज्य आहे. समतेची आणि स्वातंत्र्याची आस इथे आहे. जसे एखाद्या व्यक्तीची प्रगती त्याच्या विचार आणि आचारावर अवलंबून असते तसेच देशाचे देखील आहे. स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांमुळे महाराष्ट्र प्रगत आहे. परंतु महाराष्ट्र म्हणजे भारत नाही. स्वातंत्रानंतर ७० वर्षांनीदेखील उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात स्वातंत्र्य आणि समतेचा बराच अभाव आहे.आणि भारतीय दारिद्र्याचे मूळ ते आहे. आजमितीस अमेरिका याच कारणांमुळे जगात महाशक्ती आहे. अमेरिकेइतके स्वातंत्र्य आणि समता क्वचितच कुठे दिसते.

    ९७ कुळी मध्ये आपण स्वातंत्र्य आणि समतेचे विचार मांडू. त्यांचा आणि समृद्धीचा कसा संबंध आहे ते पाहू. जगभरातील गोष्टींचा उहापोह करू. चांगले ते आत्मसात करू.
Working...
X