Announcement

Collapse
No announcement yet.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त नालायक व्यक्ती

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त नालायक व्यक्ती

    महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त नालायक व्यक्ती कोण? याचे उत्तर आता पर्यंत मी देवेंद्र फडणवीस असे दिले असते. पण यापुढे ते धनंजय चंद्रचूड हे आहे. धनंजय चंद्रचूड भारताच्या सर्वोच्च न्यायाधीश पदावरून निवृत्त झाला पण त्याने महाराष्ट्रात दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांवर जो अन्याय झाला तो दुरुस्त केला नाही. किंबहुना हा अन्याय त्यानेच केला होता. जेव्हा संपूर्ण कायद्यांची विटंबना करून पक्ष फोडले गेले तेव्हा याने ते घडू दिले. जेव्हा त्याला कायदेशीर आव्हान दिले गेले तेव्हा याने अजून वेळकाढूपणा केला. पुढे पक्षाच्या घटना च बेदखल करत पक्ष बेदखल केले आणि फुटिराना कसली ही किंमत चुकवावी लागली नाही उलट त्यांना पक्ष बहाल केले गेले. त्याउलट पक्ष संस्थापक आणि अध्यक्ष पोरके केले गेले.

    या सर्व गोष्टीत हा भाजप चा active साथीदार बनला आणि याने भारतीय न्यायव्यवस्था जगाचे हसे केलें .

    याच्या आधी अनेक होऊन गेले आहेत. पण हा सर्वात जास्त नीच का ? याचे उत्तर असे की हा शाखेत जाणारा गोबर भक्त नाही. हा खांद्यावर किंवा छातीवर हिंदुत्वाचा झेंडा लावणारा नाही. हा अशिक्षित मागास बुद्धी हिंसक बजरंगी नाही. हा शिकलेला, सर्वोच्च पदी पोचलेला, आणि लोकशाहीची भाषा तोंडात घोळवणारा आहे. पण त्याची कृती मात्र कुठल्याही छपरि हिंदुत्ववादी कार्यकर्त्या पेक्षा जास्त घातक आहे. दाभोळकर लांकेशा यांना मारणाऱ्या गुन्हेगारांपेक्षा याचे वर्तन कैक पटीने जास्त घातक आहे. त्यांनी फक्त एक गुन्हा केला. पण याने संपूर्ण न्याय व्यवस्थेची थट्टा केली आहे. अन्याय न्याय असल्याचा आभास निर्माण केला. सर्वोच्च पदावर जाऊन प्रत्यक्ष न्यायाची विटंबना केली. त्यामुळे हा नराधम गोडसे पेक्षा जास्त नीच आहे.

    महाराष्ट्र न्यायी आहे कारण आपल्याकडे न्यायाची भावना संतांनी रुजवली. पुढे छत्रपतींनी त्याचे रूपांतर स्वराज्यात केले आणि आधुनिक काळात शाहू फुले आंबेडकर आणि कैक लोकांनी आधुनिक लोकशाही चा पाया घालून महाराष्ट्र राज्य देशात सर्वोत्तम केलें. पण असे छुपे संघी सनातनी साप लोकशाहीच्या आणि स्वराज्याच्या मंदिरात वारूळ करून बसले तर हे मंदिर कोसळणारच. चंद्रचूड सारखे अजून कित्येक साप या मंदिरात आहेत. यांना इथून बाहेर काढणे गरजेचे आहे.

    लोकशाही स्वतःचे रक्षण करू शकत नाही. स्वराज्य स्वतःचे रक्षण करू शकत नाहीं. न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत. त्यासाठी सजग नागरिकांची गरज असतें. ते रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.​
Working...
X