Announcement

Collapse
No announcement yet.

पुरोगामी स्वराज्याचा जाहीरनामा

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • पुरोगामी स्वराज्याचा जाहीरनामा

    राज्यात स्वराज्य स्थापन करून पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांनी खालील जाहीरनामा घोषित करावा.

    १) आम्ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत किमान तिप्पट करू आणि स्थानिक सामान्य जनतेचे उत्पन्न किमान दुप्पट करू.
    २) गावोगावी उद्योगशीलता वाढवू. खेड्यात १ कोटी रोजगार निर्माण करू. गावातून शहरात येण्याची गरजच बंद झाली पाहिजे.
    3) सरकारचा खर्च ३०% कमी करू आणि ते पैसे वापरून सर्व जनतेला १२ पर्यंत चे शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य सेवा मोफत देऊ
    4) दर वर्षी किमान १० नवी तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ग्रंथालये गावात उभारू ज्याद्वारे खेड्यातील जनतेला ज्ञान आणि अत्याधुनिक दळणवळण साधने उपलब्ध होतील
    5) पाच वर्षात प्रत्येक तालुक्यात एक चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन करू ज्याद्वारे खेड्यातील उद्योजकतेला चालना मिळेल.​
    6) महाराष्ट्रातील किमान ९०% नोकऱ्या मराठी भाषिकांसाठी च असाव्यात असा कायदा करू. तसेच आरक्षणाच्या पुढे जाऊन सर्व उद्योग धंद्यांनी सर्व जाती च्या लोकांना नोकरी आणि पदोन्नती मध्ये योग्य प्रतिनिधित्व द्यावे असा कायदा करू. तसेच सरकारी कंत्राटे सुद्धा स्थानिक लोकांना, लहान उद्योगां ना आणि सर्व जातीधर्माच्या लोकांना मिळावीत असे आदेश जाहीर करू.
    7) महाराष्ट्रात राज्यपाल पद कायमस्वरूपी सातारा आणि कोल्हापूर च्या भोसले घराण्यात असावे असा कायदा निर्माण करू आणि तशी केंद्राकडे मागणी करू.
    8) ज्या ज्या महाराष्ट्र सरकारी संस्था आहेत तिथे राज्य सेवेतील च अधिकारी काम करतील. जर IAS / IPS ला तिथे काम करायचे असेल तर त्यांना केंद्रीय व्यवस्थेचा राजीनामा द्यावा लागेल असे कायदे आणि नियम करू.
    9) महाराष्ट्राचा वारसा आणि खनिज संपत्ती यावर महाराष्ट्राचे नियंत्रन निर्माण करू. दिल्लीने महाराष्ट्राच्या देवळे, किल्ले आणि निसर्गसंपत्ती यामधून अंग काढून घ्यावे असा आम्ही आग्रह धरू
    10) परकीय सोशल मेडिया चा गैरवापर होणार नाही यासाठी कायदे आणू आणि राबवू.
    11) जिथे १० पेक्षा जास्त माणसे रोज जमतात आणि एकत्र कामे करतात किंवा चर्चा करतात अश्या कुठल्याही धार्मिक, सामाजिक, किंवा अन्य संस्थे ची सरकार नोंदणी करणे आवश्यक करू. विशेषतः लहान मुलांना तिथे पाठवायचे असेल तर पालकांना संस्थेचं लिखित माहिती देणे आवश्यक करू. आणि पालकांची लिखित संमती अनिवार्य करू.
    12) सर्व पद्धती चे हप्ते, खंडणी आणि वर्गणी पूर्ण बंद करू आणि गुन्हेगारी ला आळा घालून महाराष्ट्र पोलिसांना पुन्हा एकदा जनतेचे मित्र करू.

    या जाहीरनाम्यामागची वैचारिक भूमिका (strategy) या लिंक वर उपलब्ध आहे पुरोगामी वैचारिक भूमिका
    Last edited by Parag; 10-19-2024, 04:41 AM.
Working...
X