Announcement

Collapse
No announcement yet.

मकर संक्रांत, मराठे आणि स्वराज्याची अपूर्ण कहाणी 

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • मकर संक्रांत, मराठे आणि स्वराज्याची अपूर्ण कहाणी 

    मकर संक्रांत, मराठे आणि स्वराज्याची अपूर्ण कहाणी
    ---------------------------------------------------------
    कुठलाही इतिहास रंजक असतो. पण खरा इतिहास उद्बोधक असतो. आपल्याला त्यातून काही शिकता येते. मकर संक्रांत च्या दिवशी झालेले पानिपतचे युद्ध हे मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात फार महत्त्वाचे पान आहे. त्यातून आजही आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. राज्यात जसे स्वराज्य केले तसे देशात मराठ्यांनी स्वराज्य केले नाही म्हणून पानिपत हरले. आज आपण त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करणार की काही नवीन शिकणार हे आपल्या हाती आहे.

    मराठ्यांनी या दिवशी एका परकीय सत्तेपासून दिल्ली राखली. 40 हजार मराठा योद्धा (एकूण सैनिकांच्या 80-90%) पानिपतावर मेले. अजुन 60 हजार सामान्य लोक युद्धाच्या दुसऱ्या दिवशी मारले गेले. या युद्धानंतर संक्रांत कोसळली हा वाक्प्रचार मराठीत आला.

    मराठ्यां चे उत्तरेतील साम्राज्य राखण्याचा हा लढा होता. आणि त्यात मराठा बव्हंशी यशस्वी झाले. त्यांनी पंजाब वरील नियंत्रण गमावले पण इतर सर्व उत्तर भारत आणि मुख्य उत्तर प्रदेश राखला.

    पानिपत वर मराठ्यांनी काय चुका केल्या याचे विश्लेषण थोडक्यात सांगायचे तर मराठ्यांची लढण्याची साधने, तयारी आणि शिस्त कमी होती आणि मराठ्यांना उत्तरेत जनाधार नव्हता. दोन्ही गोष्टी थोडक्यात विस्ताराने बोलू.

    1) अपुरी लढण्याची साधने, तयारी , आणि शिस्त.
    मराठ्यांचे लढाऊ सैन्य संख्येने अफगाण आणि रोहील्यांच्या तुलनेत कमी होते. शत्रूकडून 75000 कसलेले सैन्य होते. मराठ्यांकडे एकूण 65000 सैनिक होते आणि त्यातही फक्त 20,000 कसलेले सैन्य होते. त्यापैकी फक्त 11,000 कसलेले मराठा सैन्य होते. आणि 9000 पगारी पण कसलेले गारदी होते. या सर्वांनी अतिशय निष्ठेने लढून आपले प्राण पानिपत वर ठेवले. अब्दाली कडे 2000 उंटावरच्या तोफा होत्या ज्या अतिशय प्रभावी ठरल्या. प्रत्यक्ष लढताना मराठा सरदार आपल्या जागा सोडून थेट शत्रूला भिडले आणि त्यातून पुढे पेशवे आणि इब्राहिम गारदी चा तोफखाना उघडे पाडले आणि मारले गेले आणि युद्धाचे पारडे फिरले.

    2) अपुरा जनाधार
    मराठ्यां चे उत्तरेतील राज्य स्वराज्य नव्हते. ते उत्तरेतून खंडणी गोळा करत होते. त्याला चौथ म्हणत असत. उत्तर भारत मुस्लिम आणि राजपूत लोकांच्या नियंत्रणाखाली होता. मराठा साम्राज्याचे तालावर गाजवून त्यांना 25% कर लादला. पण हे राजे पुरते नामोहरम केले नव्हते आणि स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या नव्हत्या . त्यामुळे उत्तर भारतासाठी मराठे आणि अब्दाली यात फरक इतकाच की अब्दाली परकीय लुटारू होता आणि मराठे खंडणी घेऊन संरक्षण करणारे. त्यामुळे अयोध्येचे राजे मराठ्यांच्या विरुद्ध लढले आणि राजपूत / जाट तटस्थ राहिले.

    पानिपत ना हिंदू मुस्लिम युद्ध होते. ना ते हरण्यामागे पेशवे हे कारण होते. जशी सर्व युद्धे असतात तसे हे साम्राज्य सांभाळण्याचे वाढवण्याचे युद्ध होते.

    मराठ्यांनी अब्दालीला पिटाळून लावले आणि पुढे उत्तर भारतात निरंकुश सत्ता स्थापन केली . रघुनाथ पेशवे आणि मानाजी पायगुडे यांनी थेट अटक पर्यंत सता विस्तारली. पण पानिपत होऊनही मराठ्यांनी उत्तरेत स्वराज्य विस्तारले नाही - दिल्ली ताब्यात घेतली नाही आणि आपला राजा तिथे नेमला नाही -फक्त चौथ/ खंडणी गोळा केली ही मराठ्यांची मोठी चूक झाली. यामुळे पुढे ते ब्रिटिशांशी हरले आणि देश पारतंत्र्यात गेला.

    आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा हाच आहे. आपण महाराष्ट्रात उत्तम राज्य केले. पुरोगामी राज्य निर्माण केले. पण दिल्ली ताब्यात घेतली नाही. खंडणी हप्ता घेणाऱ्यांना आपण मोठे केले आणि आज दुसरा एक शाह चाल करून आला आहे आणि त्याने केवळ दिल्लीचं ताब्यात नाही घेतली तर तो तुमचे स्वराज्य तोडून फोडून टाकतो आहे. तेव्हाचे मराठा सरदार चौथ गोळा करायचे पण एकनिष्ठ होते आणि त्यांनी पानिपतावर प्राण ठेवले. आजचे मराठा सरदार हप्ता गोळा करणारे भ्रष्टाचारी आहेत जे या नव्या अहमद शाह च्या हाताखाली काम करत आहेत.

    मित्रानो राज्यात जसे स्वराज्य केले तसे देशात मराठ्यांनी स्वराज्य केले नाही म्हणून पानिपत हरले. आज आपण त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करणार की काही नवीन शिकणार हे आपल्या हाती आहे.​
Working...
X