Announcement

Collapse
No announcement yet.

भाग 3 - मराठ्यांचे कर्तव्य - राज्य पुढे गेले पण मराठे मागे का?

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • भाग 3 - मराठ्यांचे कर्तव्य - राज्य पुढे गेले पण मराठे मागे का?

    #3 - महाराष्ट्र प्रगत राज्य झाले पण मराठी माणसे आणि मराठे मागे का राहिले ? आपणच देशाचे नेतृत्व करण्याची गरज का आहे आणि ते कसे करायचे.

    भाग 1 आणि 2 सारांश - भारताला प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने समृद्ध करणे हे मराठ्यांचे कर्तव्य आहे आणि तसा विचार बळकट करणे हा आपल्या चॅनल चा उद्देश आहे. जो स्वराज्याची मूल्ये मानतो तो मराठा. तिथे जात पात धर्माचा संबंध नाही. कोणतेही राष्ट्र हे माणसांपासून च बनते. आणि ते जेव्हा सर्वांना स्वातंत्र्य न्याय आणि समान संधी देते तेव्हा ते यशस्वी राष्ट्र बनते आणि तिथे सर्वांची प्रगती होते. स्वराज्य आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र दोन्हीकडे मराठ्यांनी असे राष्ट्र निर्माण केले याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. तसे राष्ट्र आता देशपातळीवर निर्माण करणे हे मराठ्यांचे कर्तव्य आहे.

    इंग्रजांनी देश ताब्यात घेतला तो मराठ्यांना हरवून. पण मग इंग्रज गेल्यानंतर देश पुन्हा एकदा मराठ्यांकडे कसा नाही आला ? मराठे मागे कसे पडले आणि त्याने त्यांचेच नाही तर देशाचे कसे नुकसान झाले याची आज चर्चा करू..

    कुठलेही सत्तांतर होते तेव्हा नवी सत्ता जुन्या सत्ते ला पूर्ण निष्प्रभ आणि हतबल करण्याचा प्रयत्न करते. इंग्रजांनी मराठे मुस्लिम आणि इतर स्थानिक राजांशी असाच व्यवहार केला. इंग्रजांनी त्यांची शस्त्रे काढून घेतली, पुढे त्यांनी त्यांचे वारस नामंजूर केले , आणि हळूहळू सगळीकडे आपल्याला अनुकूल असे दिवाण नेमले जेणेकरून सर्व राजांवर लक्ष राहील. इंग्रजांनी भारतावर ब्राह्मण बनिया आणि पारशी यांच्या साहाय्याने राज्य केले. जे कोण स्थानिक राजांना जवळ होते त्यांना इंग्रजांनी कधीही विश्वासात घेतले नाही. मराठा आणि मुस्लिम याना इंग्रजांनी विशेष करून बाजूला ठेवले.

    1818 पासून 1947 पर्यंत 130 वर्षे ही परिस्थिती राहिली त्यामुळे भारतात मराठे आणि मुस्लिम दोन्ही राज्यकर्ता वर्गाची संपत्ती आणि शक्ती संपुष्टात आली आणि इंग्रज धार्जिणा ब्राह्मण बनिया पारशी वर्ग उदयास आला. हा वर्ग मुख्यत्वे करून उत्तर भारतीय होता. न्यायाधीश जिल्हाधिकारी सैन्यातील अधिकारी आणि उद्योगपती सर्व याच वर्गातून होते. संख्येने तुटपुंजा असलेला पारशी वर्ग केवळ आणि केवळ इंग्रज कृपेमुळे श्रीमंत आहे. त्यामागे अन्य कोणतेही कारण नाही. त्याउलट स्वराज्य ज्यांनी स्थापन केले त्या मराठ्यांच्या नावाने सैन्यात एक पलटण आहे पण एकही मराठा जातीचा माणूस अजूनही सेनाध्यक्ष झाला नाही.

    स्वातंत्र्यानंतर नवीन सत्तेने जुन्या सत्तेच्या खुणा आणि प्रभाव पुसणे अपेक्षित होते. पण इंग्रजांनी त्यांनीच निर्माण केलेल्या वर्गाला सत्ता सोपवली. आणि म्हणून भारतात खरे सत्ता परिवर्तन कधीच झाले नाही. आजही इंग्रजांनी निर्माण केलेला ब्राह्मण बनिया पारशी वर्ग आपल्या लोकसंख्येच्या दहा पट जास्त प्रमाणात देशाच्या सत्ता स्थानात आला. स्वतः नेहरू गांधी ब्राह्मण आणि बनिया होते आणि अस्सल देशभक्त होते. पण इंग्रजांनी निर्माण केलेली ब्राह्मण बनिया व्यवस्था मोडण्याची दूरदृष्टी नेहरूंनी दाखवली नाही. गांधीजी तर दुर्दैवाने आधीच नथुराम च्या हातून मृत्युमुखी पडले.

    भारताने याची जबर किंमत मोजली आहे. नेहरूंचा आदर्शवाद ब्राह्मण बनिया व्यवस्थेने झुगारून दिला आणि अमर्याद ब्राह्मण बनिया वर्चस्ववाद राबवला. देश भ्रष्टाचाराने पोखरला गेला आणि शेतकरी पूर्ण ठेचला गेला. भारतात संपती निर्माण करणारे गरीब आणि शोषण करणारे श्रीमंत होत गेले. परिणामी देश इतर राष्ट्रांच्या तुलनेत मागे पडत गेला.

    तुलनेने महाराष्ट्राचे चित्र मात्र बरेच वेगळे निर्माण झाले. महाराष्ट्रात मराठ्यांनी स्वराज्याचा वारसा पुढे चालवत बहुजन हिताय बहुजन सुखाय राज्य चालवले. आणि चांगली प्रगती साधली. संपूर्ण देशातून जी माणसे महाराष्ट्रात आली त्याना आपण सामावून घेतले. आणि त्यांची आणि राज्याची प्रगती अजून चांगली झाली. पण तरीही केंद्र नेहेमीच भ्रष्ट आणि जातीयवादी ब्राह्मण बनिया होते आणि आहे. त्यामुळे मराठी माणसे आणि त्यांच्या संस्था मागे पडत गेल्या. आजही तुम्हाला दिसेल की संधी मिळाली की महाराष्ट्रातील संस्था आणि बँका गिळंकृत केल्या जात आहेत. आज महाराष्ट्रातील प्रमुख संस्था आणि उद्योग बव्हंशी अमराठी आणि विशेषत ब्राह्मण बनिया पारशी लोकांकडून नियंत्रित आहेत.

    कुठेतरी मराठी माणसांचा पण गैरसमज आहे की आपल्याला उद्योग करता येत नाही. पण हे खोटे आहे. खरे हे आहे की मराठी माणसाला आत्मभान नाही. इतिहासाची जाण नाही. आणि गैरव्यवहार करणे हे त्याला जमत नाही कारण आपण अश्या स्वराज्याचे पैक आहोत जिथे रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नये अशी छत्रपतींची सक्त ताकीद होती.

    भ्रष्ट ब्राह्मण बनिया व्यवस्था आता हिंदुत्वाच्या आश्रयाला जाऊन गुन्हेगारी बनली आहे. ही गुन्हेगारी मोडून देशात स्वराज्य आणि सुराज्य प्रस्थापित करणे मराठी माणसांना आणि मराठ्यांना शक्य आहे. आपल्याकडे स्वराज्याचा आणि आधुनिक महाराष्ट्राचा वारसा आहे. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मोडून व्यापक पाया असलेले स्वराज्य आपण देशभर निर्माण करू शकतो. त्याशिवाय देश प्रगत राष्ट्र होणार नाही.

    ते कसे करायचे हे आपण पुढच्या भागात बोलू. 🙏🏼🙏🏼​
Working...
X