Announcement

Collapse
No announcement yet.

भाग 2 - मराठ्यांचे कर्तव्य - संकल्पना - मराठा , राष्ट्र , प्रगती

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • भाग 2 - मराठ्यांचे कर्तव्य - संकल्पना - मराठा , राष्ट्र , प्रगती

    Forums मराठा म्हणजे कोण , राष्ट्र म्हणजे काय आणि प्रगती म्हणजे काय

    भाग 1 सारांश - भारताला प्रगत राष्ट्रांच्या तोडीने समृद्ध बनवायचे असेल तर त्यासाठी स्वातंत्र्य न्याय आणि समता प्रस्थापित करणे हा एकमेव मार्ग आहे. मराठ्यांचे ते कर्तव्य आहे. तसा विचार बळकट करणे आणि तसा अविचल ध्यास घेणारे समविचारी लोक जोडणे हा या चॅनल चा उद्देश आहे.

    मागील पोस्ट मध्ये आपण मराठ्यांचे राष्ट्रीय कर्तव्य ही कल्पना मांडली आणि असा विचार बळकट करणे हा या चॅनल चा उद्देश आहे असे स्पष्ट केले.

    पण मग मराठा म्हणजे कोण ? स्वराज्याची मूल्ये जो मानतो तो मराठा. आणि ही केवळ माझी धारणा नाही - हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजतागायात हाच मराठ्यांचा इतिहास आहे. मराठा जात जरूर आहे. पण त्याहून मराठा एक समाज आहे. एक राष्ट्र आहे. हा समाज आणि हे राष्ट्र स्वातंत्र्य समता आणि न्यायावर आधारित आहे.

    टिळकांनी स्वराज्याची मागणी केली हा योगायोग नाही. फुले आंबेडकर शाहू विचारसरणी आपल्याकडे निर्माण झाली आणि 1950 पासून महाराष्ट्राने बहुजन हिताय बहुजन सुखाय भूमिका घेतली हा योगायोग नाही. स्वराज्याची मूल्ये आपल्या समाजात आहेत याचे ते द्योतक आहे.

    त्यामुळे जे स्वतः ला मराठा मानतात आणि जे या मूल्यांना मानतात ते मराठा अशी आपली भूमिका आहे. इथे मूल्यांचा आग्रह आहे. जाती धर्म किंवा वंशाचा नाही. जे ही मूल्ये मानतील अश्या समविचारी लोकांची मोट बांधून मराठ्यांनी आपले कर्तव्य करावे. इतर समविचारी लोक कदाचित शीख असतील , राजपूत असतील , मुस्लिम , बंगाली, तमिळ काही असो. त्यांना सहकारी करून घेऊन स्वराज्याचा वारसा देशभर निर्माण करणे मराठ्यांचे कर्तव्य आहे. कुणी स्वतःला मराठा म्हणावे असाही आग्रह नाही. पण जे म्हणतात त्यांचे कर्तव्य हे आहे की त्यांनी स्वराज्याचा वारसा देशपातळीवर न्यावा आणि देश प्रगत करावा.

    स्वराज्याची मूल्ये डोळ्यासमोर असली की आपोआप राष्ट्र म्हणजे माणसे हे सूत्र प्रस्थापित होईल. जेव्हा आपण राष्ट्र ही कल्पना धर्म आणि संस्कृती ला जोडतो तेव्हा आपण नकळत माणसांना विसरतो. आणि दांभिक बनून प्रतीके पुजू लागतो. गाय गंध अक्षता घंटा जास्त महत्त्वाचे होतात आणि खऱ्या माणसापेक्षा कल्पनेतली प्रतीके भारी होऊ लागतात.

    मूल्यांचा आग्रह धरणे म्हणून गरजेचे आहे. कारण मूल्ये व्यक्तीशी निगडित असतात. स्वातंत्र्य सर्वांना. समता सर्वांना. आणि न्याय सर्वांना. त्याउलट प्रतीके भोंगळ असतात. गंध लावून काय होणार, दक्षिणा देऊन काय होणार , गायीची पूजा करून काय होणार. कुणाच्या तरी खिशात दक्षिणा जाणार. भारत माताकी जय किंवा कुणाच्या हि नावाचा घोष करून काय होणार. कुणीतरी राजकारणी माणूस आपली कारकीर्द पुढे नेणार. सामान्य व्यक्तीला फायदा होईल अशी मूल्ये सतत डोळ्यापुढे ठेवून च सामान्य माणूस पुढे जाईल. आणि सामान्य माणसे पुढे जाणे म्हणजे च देश पुढे जाणे.

    अमेरिका स्वातंत्र्य समता आणि न्याय यांचा आग्रह धरते म्हणून अमेरिका सर्वांना हवीहवीशी वाटते. या मुल्यांमुळे अमेरिकेत सामान्य माणूस जात पात प्रांत धर्म कोणताही असला तरीही प्रगती करू शकतो. भारतात अशी मूल्ये महाराष्ट्रात आहेत म्हणून भारतातून सर्व लोकांना इथे यावेसे वाटते. आणि जी माणसे इतर राज्यात प्रगती करू शकत नाहीत ती महाराष्ट्रात करू शकतात. म्हणून महाराष्ट्र राज्य देशात प्रगत आहे. कारण इथे सामान्य माणूस प्रगती करू शकतो.

    पण मग प्रगती म्हणजे काय ? पंतप्रधानाला अद्ययावत विमान असणे पण 80 कोटी लोकांना खाण्याचे धान्य सरकार कडून फुकट घ्यावे लागणे म्हणजे प्रगती का ? घरांच्या किमती कोट्यवधी रुपयांच्या असणे पण करोडो लोकांनी झोपडपट्टी मध्ये राहणे प्रगती नाही.

    प्रगती म्हणजे देशातील 80% लोकांना
    आधुनिक सुख सोयी विकत घेता येणे. अन्न , वस्त्र , निवारा , शिक्षण , आणि आरोग्य या तर मूलभूत गरजा आहेत. पण गाडी असणे, घरात टीव्ही असणे , इंटरनेट असणे , स्मार्ट फोन असणे , स्वयंपाक घरात, शेती करताना, किंवा कारखान्यात यंत्रे असणे , खाजगी आणि सार्वजनिक जीवनात तंत्रज्ञानाचा वापर असणे, अधून मधून सहलीला जाणे यासर्व गोष्टी प्रगत देशात सर्वांना उपलब्ध आहेत. भारतात फक्त 5-10% लोकच हे सर्व उपभोगत आहेत. उरलेले 90-95% लोक साधारण जीवन जगत आहेत . आणि तळाचे 50% लोक अगदीच गरीब आयुष्य जगत आहेत. किंबहुना भारतात तळाचा 50% वर्ग हा वरच्या 5-10% वर्गाचा नोकर म्हणूनच काम करतो. त्याला सुख साधने नाहीत , उत्पन्न नाही , आणि अमाप शोषण आहे. बहुतांश शेतकरी कष्टकरी वर्ग आहे हा. या वर्गातील बहुतांश लोक मध्यमवर्गात यायला हवेत. त्याला प्रगती म्हणता येईल. संख्या शास्त्रात माणसांची उंची नॉर्मल distribution नुसार असते. दोन चार टक्के लोक खूप उंच असतात , दोन चार खूप बुटके असतात पण बहुतांश लोक साधारण उंच असतात. तसे असायला हवे. दोन चार टक्के लोक खूप श्रीमंत असतील , पण उरलेले सगळे अगदी गरीब नको. तसे चित्र सहसा हुकुमशाही देशात दिसते. हुकुमशहा आपल्या मित्र आणि नातेवाईक यांना श्रीमंत करतो आणि बाकी सगळी जनता यांची गुलाम होते. त्याला प्रगती नाही म्हणता येणार. मराठ्यांचे हे कर्तव्य आहे की सर्वांना बरोबर घेऊन प्रगती केली पाहिजे. किंबहुना महाराष्ट्र राज्याने ती तशी केली म्हणूनच राज्य प्रगत झाले.

    आज इथेच थांबतो. पुढच्या वेळी आपण बोलू की महाराष्ट्र प्रगत झाले पण मराठी माणूस आणि मराठा समाज मागे का राहिला. मागे असला तरीही आपण देशाचे नेतृत्व करण्याची गरज का आहे आणि ते नेमके कसे करायचे.

    🙏🏽🙏🏽​
Working...
X