" अमेरिकन मराठा " चॅनल वर आपले स्वागत आहे. भारताला प्रगत राष्ट्रांच्या तोडीने समृद्ध बनवायचे असेल तर त्यासाठी स्वातंत्र्य न्याय आणि समता प्रस्थापित करणे हा एकमेव मार्ग आहे. तसा विचार बळकट करणे आणि तसा अविचल ध्यास घेणारे समविचारी लोक जोडणे हा या चॅनल चा उद्देश आहे.
भारतातील सर्व प्रश्न या तीन मूल्यांच्या निकोप दृष्टिकोनातून पाहिले तर ते सुटून देश प्रचंड वेगाने प्रगती करू शकेल असा आमचा दृढ विश्वास आहे. आपण या चॅनल मध्ये तसा प्रयत्न करू.
कुठल्याही प्रश्नांची उकल करण्यासाठी ते प्रश्न नीट समजणे आणि मांडणे गरजेचे असते. दुर्दैवाने भारतीय राजकारण आणि समाजकारण अनेक चांगल्या वाईट प्रवाहात अडकून गढूळ झाले आहे. आपण जगात प्राचीन संस्कृती आहोत. दीड अब्ज लोकसंख्या असूनही जगात का मागे आहोत याची उत्तरे अश्या गढूळ वातावरणात मिळणे अवघड आहे. आपल्या या चॅनल मध्ये आपण स्वातंत्र्य न्याय आणि समतेच्या दृष्टिकोनातून वैचारिक स्पष्टता निर्माण करू.
असे करत असताना इतिहासा त कोणी कुणावर अन्याय केला या पेक्षा भविष्यात न्याय कसा प्रस्थापित होईल यावर भर देऊ. कृतिशील वैचारिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करू.
मी आणि माझ्या सारखे हजारो लाखो मराठा अमेरिकेत आहेत. स्वराज्याचे प्रेम नसणारा मराठा सापडणे कठीण आहे. अमेरिकेत येऊन आम्हाला असे दिसते आहे की ज्या मुल्यांमुळे स्वराज्य स्थापन झाले आणि शेकडो वर्षे आपल्या मनावर राज्य करते आहे; त्याच मुल्यांमुळे अमेरिका जगात सुपर पॉवर आहे.
अमेरिकन असण्यासाठी स्वातंत्र्य न्याय समतेवर निष्ठा असणे पुरेसे आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल तरी अमेरिकन होऊ शकता. मराठ्यांचा इतिहास असाच आहे. स्वातंत्र्य न्याय आणि समता ही स्वराज्याची वैशिष्ट्ये होती म्हणून अठरापगड लोक राज्य नाही राजा नाही तरीही मुघलांशी 27 वर्षे लढले आणि जिंकले. मराठा ही केवळ एक जात राहिली नाही. मराठा एक राष्ट्र झाले. स्वराज्याचा हाच वारसा स्वातंत्र्य उत्तर काळात महाराष्ट्राने जोपासून देशात सर्वात जास्त प्रगत स्थान मिळवले आहे. राज्याच्या प्रगतीचे रहस्य राज्यामध्ये न्याय स्वातंत्र्य आणि समता आहे का यामध्ये आहे.
दुर्दैवाने राज्य जसे मराठ्यांनी चालवले तसे देश कधी चालवला गेला नाही. आणि म्हणून देश मागे राहिला आहे.
स्वराज्याचा वारसा राष्ट्रीय पातळीवर नेऊन देश समृद्ध करणे हे मराठ्यांनी आपले कर्तव्य मानले पाहिजे.
ते कसे करायचे, आपल्याला ते इतकी वर्षे का जमले नाही आणि आज नक्की परिस्थिती काय आहे आणि का आहे याचा आपण कृतिशील मागोवा घेऊ.
मराठ्यांना जाटांना आणि एकूणच समस्त शेतकरी वर्गाला आत्महत्या करण्याची आणि आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. असे असताना मराठा देशाचे नेतृत्व कसे करू शकतील किंवा दिशा कशी देऊ शकतील असे प्रश्न स्वाभाविक आहेत. त्यावर आपण बोलू..
आज इतके बोलून थांबतो. चॅनल चा उद्देश आपण स्पष्ट केला अशी आशा बाळगतो. पुढच्या काही दिवसात अजून काही राहिले असेल तर बोलूच.
🙏🏽🙏🏽