माझा कट्टर भाजप समर्थक ते कट्टर विरोधक हा प्रवास.
मला खूप जण मेसेज करतात ,फोन करतात कि तुला इतका राजकारणात रस का ? तुला राजकारणात जायचे आहे का ? तू आणि तुझे काम आणि फॅमिली इतके बस्स नाही का ? हे सर्व जण माझे हितचिंतकच आहेत याची मला खात्री आहे.
मित्रांनो, आपण सर्व रोज गणिक कित्येक लोकांना भेटत असतो ,पुस्तके, वर्तमानपत्र वाचत असतो ,बातम्या, डिबेट पाहत असतो. आपल्या सर्वांच्या हातात स्मार्ट फोने असतो. आपण त्यावर येणारे फॉर्वर्डस पाहत असतो आणि यातून आपली एक धारणा तयार होत असते.
माणसाला जनावरांपासून पासून वेगळी करणारी सद्सदविवेक बुद्धी/ conscious/ अंतरात्मा हे आपल्याला काहीतरी सांगत असतात,सुचवत असतात.
अशावेळी आपण बरे आणि आपले काम बरे ही वृत्ती ब्रेन ला पटत असली तरी हार्ट ला पटत नाही.
कितीजण नुसते फॉरवर्ड ढकलत असतात तर आपण आपले स्वतःचे विचार मांडून का फॉरवर्ड करू नयेत असा विचार येतो. असो. (नमनालाच घडी भर तेल नको )
ब्राम्हण कुटुंबात जन्माला येणारा प्रत्येकाला हिंदू आणि हिंदुत्व यावर एक सुप्त आकर्षण असतेच, माझ्या मते ते आनुवंशिक असावे. त्यात जर चित्पावन असेल तर बोलायलाच नको.
झाले ,सुरुवात झाली संघापासून ,त्यातील खेळ,देशभक्ती प्रबोधन ,बौद्धिक ,प्रार्थना याची गोडी शालेय जीवनांत लागली. मग १९९२ च्या आसपास चा काळ अतिशय रोमहर्षक काळ, ती आडवाणींची रथयात्रा, त्यातून सामायिक विचारांच्या मुलांबरोबर बाबर कसा दुष्ट होता आणि पर्यायाने येथील मुसलमान कसे वाईट आहेत , ते कसे पाकिस्तान ला सपोर्ट करतात याच्या कथा , छत्रपती संभाजी यांची औरंग्या ने केलेली हत्या, काश्मिरी पंडित ,त्यांचे हाल ,मिरजेत काही वेळा पाकिस्तान क्रिकेट मॅच जिंकल्यावर उडालेले फटाके, मुस्लिमांच्या गल्ल्या ,तेथील गलिच्छपणा हे सर्व पाहून एकंदरीत मुस्लिमांविरुद्ध biased मत तयार होत गेले. त्यात त्यावेळी खूप समर्पक वाटणारा प्रश्न पण या मताला pampering करायचे काम करायचा "जर हिंदू साठी हिंदुस्थान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान अशी वाटणी झाली आहे तर माझ्या देशात मुस्लिम लोक का ?" ह्या प्रश्नाचे समर्पक उत्तर नंतर मिळाले हि गोष्ट वेगळी.
मला आठवतेय मी बाबरी पाडल्यावर मी आणि माझा एक शाळेतील मित्र आनन्दाने घराजवळ असलेल्या थडग्यांवर दगडे पण मारून आलो होतो. (एक किलर इन्स्टिंक्ट होते Yes, we won).
मग जसे जसे मोठे होऊ लागलो तसे तसे हिंदुत्व आणि त्याची विचारसरणी जास्तच आवडायला लागली. मुस्लिम हि भारताला लागलेली कीड आहे आणि भारतातील ९०% मुस्लिम हे पाकिस्तान धार्जिणे आहेत यांवर माझ्या मनात थोडा पण संशय राहिला नव्हता. एकतर त्यांनी आपल्या देशाचा स्वीकार करावा नाहीतर येथून निघून जावे असे साहजिकच वाटू लागले होते.
नंतर गुजरात दंगल आणि मुंबई बॉम्बस्फोट ,दंगल यातून मुस्लिम द्वेष जास्तच घट्ट होत गेला.
या सर्व गरादोळात नंतर वाजपेयी सरकार केंद्रात आले आणि त्यांनी खरंच चांगली कामगिरी केली त्यामुळे देशापुढील समस्या फक्त भाजपाच सोडवू शकते हा ग्रह डोक्यात फिट्ट बसला.
UPA १ आणि २ मध्ये MMS पंतप्रधान असले तरी सोनिया गांधी ह्याच सरकार चालवत आहेत ,त्या इटालियन आहेत आणि त्या भारताच्या हिताचा विचारच करू शकत नाहीत अशी धारणा डोक्यात फिट्ट होती.
२०११ च्या आसपास भारतात internet क्रांती झाली ,social media आणि information चा महापूर आला. त्या सर्व माहितीमधून ५०० वर्षांपूर्वी बाबराने काय केले , सावरकरांना बापूंच्या काँग्रेस ने कसे झिडकारले, नेहरू कसे सर्व बाबतीत शोकीन होते ही सर्व माहिती पोच मिळू लागली आणि त्यातून मुस्लिम आणि काँग्रेस द्वेष जास्तच वाढू लागला.
त्याचवेळी अण्णा हजारे आणि त्यांची movement पण सुरु झाली आणि तथाकथित काँग्रेस भ्रष्टाचाराच्या कथा वाचून मन उद्विग्न व्हायला लागले. हि ख्रिस्ती बाई अजून किती दिवस देशाला लुबाडणार असा विचार यायला लागला.
आणि मग २०१३ च्या आसपास नरेंद्र मोदी हे नाव सगळीकडे झळकू लागले. त्यांची तडफ ,भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे , "सब का साथ ,सब का विकास " च्या घोषणा, त्यांनी केलेल्या गुजरात मॉडेल बद्दलच्या चर्चा याने असे वाटू लागले की या सगळ्यवार एकच उपाय "नरेंद्र मोदी."
गुजरात दंग्या चा आरोप त्यांच्यावर होता आणि मी जरी त्यावेळी कट्टर हिंदुत्ववादी असलो तरी पण गुजरात हत्याकांड मला पसंद पडले नव्हते. पण शेवटी प्रत्येक माणसाला भूतकाळ असतो या उक्तीने , त्यांच्या विकासाच्या तथाकथित मॉडेलने आणि हिंदुत्वाच्या ओढीने माझ्यामधील त्यांच्या विषयीचे किंचित किल्मीष दूर झाले.
मला आठवतेय ,मी मोदींची सांगलीमधील ,भोकरे कॉलेज जवळील सभा ऐकायला भर उन्हात गेलो होतो. तसेच मी माझ्या कॉन्टॅक्ट मधील खूप लोकांना मोदी ऐकायला या असे फोन करून सांगितले होते. अपेक्षेप्रमाणे मोदींनी भाषणात बाजी मारली ,भारावून गेलो.
मग २०१४ चा काँग्रेसचा सफाया आणि मोदींची संसदेत दमदार एन्ट्री ,ती पण डोके टेकवून. आता सुवर्ण युग/राम राज्य म्हणतात ते प्रत्यक्ष येणार नव्हे आलेच असा विश्वास बसला.
मोदी किती तरी देशांमध्ये व्हिसिट करून येत होते , WA वर ते कसे १६-१६ तास काम करतात वगैरे पण बातम्या यायच्या ,छाती वर यायची.
यात एक घटना अशी घडली कि ज्याने माझा turnaround ला सुरुवात झाली. कन्हय्या कुमार आणि त्याने "भारत तेरे तुकडे होंगे" अशी दिलेली घोषणा. जेव्हा मी सत्य पडताळून पहिले असता कळाले की कन्हय्या ने अशी घोषणा दिलीच नव्हती.हा JNU मधील स्थानिक संघर्ष होता ज्यात अभाविप चा समावेश होता.
मी जेव्हा हे सत्य काही लोकांसमोर मांडायला बघितले तेव्हा मला काँग्रेस चा गुलाम म्हणले गेले.
नंतर चा धक्का हा नोटबंदी चा होता. मी जेव्हा लोकांचे ,शेतकऱ्यांचे नोटबंदी ने झालेले हाल पहिले. मी या बाबतीत प्रश्न केल्यावर माझे वैयक्तिक नोटबंदी ने प्रचंड नुकसान झाले असणार म्हणून मी विरोध करत आहे असे बोलले गेले.
जेव्हा बँकेने जवळपास मार्केट मधील जवळपास ९९ टक्क्या पेक्षा जास्त रक्कम परत जमा झाली हे सांगितले तेव्हा पण मला ही घोडचूक मोदींनी कोणाच्या तरी सांगण्यावरूनच ,भारताच्या भल्यासाठी केली असे वाटले. माझा MODI या नावावर विश्वास अजून कायम होता.
त्यांच्या जन धन योजना , उज्वला गॅस , घरोघरी टॉयलेट साठी अभियान , रेरा ऍक्ट, मुद्रा लोन असे चांगले उपक्रम देखील होते.
मेक इन इंडिया ,स्टार्ट अप योजना ,स्मार्ट सिटी अशा फसव्या कागदी योजना देखील होत्या. गडबडीत लादलेला GST हे देखील मोठे अपयश होते.
ह्या सगळ्या मध्ये IT Cell चे राज्यांमधील इलेकशन्स लक्षात घेऊन धार्मिक उन्माद पसरवणारे मेसेज पसरवणे सुरु होतेच.
नेहरू ,गांधी फॅमिली ,सोनिया ,राहुल ,प्रियांका यांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जाचे फॉर्वर्डस ढकलून त्याला फक्त जोक आहे असे संबोधले जाऊ लागले.
ह्या जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याला मी विरोध केल्यावर मला पाकिस्तानी ,मुस्लिम धार्जिणे ,कॉंगी ,लेफ्टिस्ट ,sickular असे संबोधले गेले.
हा द्वेष इतका मुरवला गेला होता की फॅमिली मधील व्हाट्सअप ग्रुप्स मध्ये पण हेच फॉरवर्ड केले जाऊ लागले म्हणून मला नाईलाजास्तव फॅमिली ग्रुप्स मधून पण बाहेर पडावे लागले.
ह्या दरम्यान माझे वाचन जसे वाढत गेले तसे मला हिंदुत्व व त्यातील फोलपणा लक्षात येऊ लागला. अखंड भारत हि संकल्पना कशी unvalid होती आणि अखंड भारत या संकल्पनेचा वापर कसा मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी वापरला जात आहे हे लक्षात येऊ लागले.
देशाची फाळणी धर्मावर झाली असली तरी प्रत्यक्षात लोकसंख्येची अदलाबदल हे कसे impractical होते हे लक्षात येऊ लागले.
नेहरूंनी भारताची उभारणी कशी केली ,त्यांना अभिप्रेत असलेला securalism ज्याची आज खिल्ली उडवली जाते तो नेमका काय होता आणि तो फॉलो केल्याने देशाचे काय फायदे झाले हे कळू लागले.
कामानिमित्त देशो देशी प्रवास केल्याने भारताची आतापर्यंत काय इमेज होती आणि आता ती अतिरेकी हिंदुत्वामुळे कशी लयाला लागली हे दिसायला लागले.
भारतात आज जवळपास २५ कोटी मुस्लिम आणि इतर जातींचे जवळपास १० कोटी लोक आहेत.ह्या लोकांना alienate करून/ single out करून देश म्हणून आपली प्रगती होणार नाही हे पण लक्षात यायला लागले.
त्यात NRC/CAA सारखे लोकांमध्ये भेदभाव करणारे कायदे आणले गेले. आसाम मधील लोकांचे ५० वर्षापूर्वीचे कागदपत्र जमवताना झालेले हाल,त्यांना रांगेत उभारून आपण भारतीय आहोंत हे सिद्ध करायला लावणे , जे आपले १९७१ पूर्वी त्यांचे पूर्वज हे भारताचे नागरिक होते हे सिद्ध करता येणार नाही त्यांना हाकलून देण्याची किंवा डीटेंशन सेन्टर ला पाठवण्याची योजना नक्कीच अव्यहार्य आहे हे जे सामान्य नागरिकांना कळते ते सरकारला कळू नये का ?
नक्कीच कळते पण त्यातून अतिरेकी हिंदूच्या passionate conviction ( against muslims) ला pampering करत राहणे हाच अजेन्डा होता.
अतिरेकी राष्ट्रवाद जोपासला जाऊ लागला , अमित शाह यांनी गुजरात मध्ये इलेकशन रॅली मध्ये आम्ही २५० अतिरेकी मारल्याचा दावा केला. भारतीय हवाईदलाच्या या अभिमानास्पद कामगिरीचा जेव्हा निवडणुकीत वापर करायला काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी विरोध केला तेव्हा विरोधी पक्ष हवाईदलावर शंका घेतात अशी आवई उठवली गेली.
एखाद्या देशाचा अजेन्डा हा त्या देशामधील सर्व लोकांना आर्थिक स्तरावर वॉर आणणे , रोजगार आरोग्य ,शिक्षण यावर काम करणे हे अभिप्रेत असते पण हे सोडून फक्त धार्मिक उन्माद माजवून सत्तेच्या खुर्चीत राहणे हेच मोदी आणि त्यांच्या सरकारचे उद्दिष्ट आहे हे स्पष्ट झाले.
भाजप IT Cell ने एक "भक्त" ही नवीन जमात तयार केली. भाजप किंवा मोदी विरोधी बोलणाऱ्याला तू पाकिस्तान मध्ये जा किंवा तू १० बापाचा आहेस का, तुझा कापला आहे का, अशा शब्दात हेटाळणी होऊ लागली.
तसेच हे सरकार उद्योग, रोजगार ,आरोग्य ह्या आघाडयांवर पण संपूर्ण अपयशी ठरले आहे. भारताचा पंतप्रधान जनतेला उद्देशून बोलताना जेव्हा स्वदेशी चा अवलंब करा असे सांगतो त्याच वेळी त्या माणसाची उद्योग ,international business, globalization याविषयी असलेली मर्यदित समज स्पष्ट होते.
ह्या सरकारला हटवणे हे प्रत्येक भारतीयांची प्राथमिकता असायला हवी.
जय हिंद.
- राहुल खरे