*माझ्या विचांसरणीचा प्रवास*
- मंगेश गोगटे
तसा माझा विचारसरणीचा शिफ्ट प्रचंड नाही.
राईट टू द सेंटर ते लेफ्ट टू द सेंटर बस्स.
पण या प्रवासाला खूप वर्षांचा विचार व वाचन व अभ्यास लागला.
माझी सर्वात आधीची राजकीय आठवण म्हणजे इंदिरा गांधी यांचा ७७ च्या आणीबाणी नंतर च्या निवडणुकी नंतर चां पराभव.
त्या वेळी आमच्या संपूर्ण एरियात जल्लोष मनवला गेला होता.
या वरून इंदिरा गांधी म्हणजे कोणी वाईट व्यक्ती असेल असा माझा समज तेव्हा झाला होता.( वय वर्ष ७ )
नंतर च्या काळात महाराष्ट्र काँग्रेस मधील सुंदोपसुंदी पाहून काँग्रेस म्हणजे सत्ता लोलुप व्यक्तींचा समूह अशीच प्रतिमा झाली होती.( अर्थात त्या वेळची काँग्रेस तसलीच होती म्हणा)
मात्र ८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या ज्या प्रकारे झाली त्याच्या खूप धक्का बसला व मनापासून दुःख झाले.
नंतर आलेल्या राजीव गांधी यांनी अनुभव नसतांना खूप चांगला कारभार केला असे माझे आजही मत आहे.
देशाला एकविसाव्या शतकात नेण्याची तयारी हे राजीव यांचे प्रमुख काम
आजची संगणक व टेलिकॉम क्रांती ची मुळे तेव्हाच रोवली गेली.
अर्थात शहाबानो प्रकरण व बाबरी मशीद चे कुलूप उघडुन राम मंदिर आंदोलनास हवा देणे या घोडचूका त्यांनी नक्कीच केल्या.
पण बोफोर्स च्या आरोपात मला तरी फार तथ्य तेव्हाही वाटले नव्हते.
नंतर राम मंदिर चे आंदोलन सुरू झाले तेव्हा मला ते आंदोलन न्याय्य वाटत होते.
जर बाबराने राम मंदिर पाडून तेथे मशीद बांधली असेल तर ती हटवून तिथे राम मंदिर बांधण्यात चूक ती काय ? असे मला वाटत असे.
त्या काळात अडवाणी ,बाळासाहेब ते साध्वी( ?) ऋतुंभरा यांची जहाल भाषणे ऐकून उन्माद निर्माण होत असे.
जेव्हा बाबरी मशीद जंगलीपणे पाडली गेली तेव्हा मला धक्का तर बसला पण सुप्त आनंद पण झाला.
(पण मला स्वतः ला जर मशीद हलवून दुसरी कडे नेली असती तर जास्त बरे वाटले असते)
पण नंतर च्या उसळलेल्या दंगली पाहून सुप्त आनंद विरून ही लगेच गेला.
नंतर दाऊद ने बदला म्हणून घडवलेले मुंबई बॉम्बस्फोट पाहून पुन्हा मुस्लिम द्वेष वाढून गेला.
या सर्व काळात माझे मत सेना भाजप यांनाच होत असे.
पुढे जेव्हा वाजपेयी यांचे तेरा दिवसाचे सरकार येऊन गेले व एकदा एका मताने पडलेले सरकार गेले तेव्हा वाजपेयी बद्दल खूप वाईट वाटले होते.
हा माणूस सच्चा आहे याला एक संधी तरी मिळायला हवी.
बाकी सर्व पार्टी ना भाजप ची इतकी एलर्जी का ? असा प्रश्न मला पडत असे.
पुढे महाराष्ट्रात सुद्धा सत्तांतर होऊन मनोहर जोशी सत्तेत आले तेव्हा खूप आनंद झाला होता.
शिवाजी पार्क वरच्या शपथ विधीस मी गेलो सुद्धा होतो.
आता केंद्रात व राज्यात भाजप ची स्वच्छ माणसे सत्तेत आहेत आता देशात रामराज्य येणार याची खात्री होती.
पण दोन्ही सरकार चां कारभार बघता हळूहळू माझा भ्रमनिरास होऊ लागला.
म्हणजे वाजपेयी व जोशी बद्दल आदर कायम होता पण एकूण कारभार व भ्रष्टाचाराचे आरोप बघता काँग्रेस पेक्षा फार काही वेगळेपणा जाणवत नव्हता.
कारगिल पण सरकार च्या सीमेवरील दुर्लक्षामुळे ओढवलेले युद्ध होते असेही वाटले.
कंदाहार हायजेक प्रकरण पण नीट हाताळले गेले नाही.
संसदेवरील हल्ला होणे पण भयंकर फेल्युआर होते.
मात्र शेवटची काडी ठरली ती मात्र २००२ चे गुजरात जेनोसाईड.
त्या दंगली नव्हत्या ते तो जेनोसाईडच होता.
( जसा ८४ चां शीख जेनोसाईड होता तसाच हा )
इव्हन गोध्रा चे जळीत कांड पण हे घडवून आणले गेले होते असेही लक्षात आले.
मोदी च्या नेतृत्वाखाली गुजरात सरकार ने पूर्ण दंगल घडवून आणली होती व हिंदू दंगेखोर व सरकारी यंत्रणा एकत्र येऊन मुस्लिम लोकांना ठार करत होते. ही गोष्ट वाजपेयी यांना कशी कळत नाही याचे आश्चर्य वाटत होते.
नंतर राजधर्माची आठवण करून देण्याचे उपचार पार पाडून वाजपेयी यांनी मोदी ला अभय दिले हे पाहून वाजपेयी यांच्या बद्दल उरला सुरला आदर संपला.
आणि आयुष्यात पहिल्यांदा मी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ला मत दिले.
तेही भाजप चे कामसू उमेदवार राम नाईक असून सुद्धा काँग्रेस च्या गोविंदा यास मी मत दिले
इतका मला भाजप चां उबग आला होता.
नंतर काँग्रेसला बहुमत मिळून सुद्धा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद नाकारले व मनमोहन सिंग सारख्या योग्य व्यक्ती ला त्या पदावर बसवले हे पाहून सोनिया गांधी बद्दलचां आदर खूप वाढला.
महाराष्ट्रात सुद्धा विलासराव देशमुख आदी मुख्यमंत्री यांनी बराच चांगला कारभार केला
त्या वेळी सुद्धा विरोधी पक्ष आरोप करीत तेव्हा काँग्रेस पक्ष आरोप सिद्ध झाले नसतील तरी त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावत.
ही गोष्ट मला नैतिक वाटत असे ( आता तर कोर्टाने शिक्षा करेपर्यंत भाजप चे लोक सत्तेला चिकटून राहतात )
चार ते चौदा पर्यंत काँग्रेस ने बराच चांगल्या प्रकारे कारभार केला.
या काळात मी काँग्रेस चां मतदार असलो तरी कट्टर काँग्रेस समर्थक मात्र नव्हतो.
तो प्रवास झाला सोशल मीडिया च्या उदयानंतर.
१४ साली मोदीचां विजय यात काही आश्चर्य नव्हते.
अण्णा च्या (प्रायोजित) आंदोलनानंतर जशी हवा देशात तयार केली गेली होती त्यात मोदी उदय झाला नसता तर आश्चर्य होते.
पण मोदी ला गुजरात दंगली विरसून इतके समर्थन मिळेल असे वाटले नव्हते.
एक दोन वर्ष मला सुद्धा आशा होती की मिळालेल्या जनदेशाचा सदुपयोग करून मोदी देशाला पुढे नेईल.
पण सोशल मीडिया वर विरोधी लोकांचे भयानक ट्रॉलिंग सुरू झाले , आमिर खान सारख्या माणसावर पाकिस्तान ला निघून जा सारखे हल्ले सुरू झाले आणि निराशा वाढू लागली.
नोटबंदी च्या मूर्ख निर्णयानंतर देश कोणाच्या हाती दिलाय असे वाटू लागले.
नंतर up मधे योगी सारख्या दंगेखोर माणसाला गादी वर बसवणे म्हणजे कळस होता.
दुसरी कडे सोशल मीडिया च्या उदयानंतर लोकांच्या पोटातील गोष्टी ओठावर येऊ लागल्या. आणि कित्येक समंजस मित्र व नातेवाईकांचे मास्क फाटून खरे चेहरे उघड झाले.
हा खरे तर सर्वात मोठा धक्का होता.
सोशल मीडिया द्वारे पसरवल्या जाणाऱ्या विखारी व खोट्या पोस्ट अशी लोक फॉरवर्ड करत होती जे खऱ्या आयुष्यात खूप सज्जन भासत.
या खोट्या गोष्टीचां प्रोपोगांडा भडिमार झाल्यावर माझे वाचन वाढले व त्या गोष्टीने खरे स्वरूप जाणून घेणे वाढले.
गांधी नेहरू व इतर खरे स्वातंत्र्यवीर यांच्या बद्दल आदर खूप खूप वाढला.
आणि दुसऱ्या बाजूला सावरकर,गोडसे यांच्या खऱ्या भूमिका समजत गेल्या तश्या असल्या लोकांबद्दल एकेकाळी आदर होता याबद्दल स्वतः ची लाज वाटू लागली.
गांधी नेहरू व आंबेडकर यांच्या स्वप्नातील समता मूलक भारत आपल्याला हवा हे पक्के झाले.
आयडिया ऑफ इंडिया जर जिवंत ठेवायची असेल तर आताची ब्राम्हण्यवादी, मनुवादी , क्रोनी कॅपिटलिस्ट सत्ता हद्दपार व्हायला पर्याय नाही याची खात्री झाली.
इतक्या वर्षात मला संघाबद्दल आकर्षण कधीही वाटले नाही.
परंतू ते चांगले कार्य करत आहेत असा माझा समज होता.
पण १४ नंतर जसा माझा अभ्यास व वाचन वाढले तसे संघाचा खरा चेहरा व मूळ उद्देश उघड होऊ लागला.
आयसीस व आरेसेस यात फरक असेल तर फक्त स्पेलिंगचां हे मला स्पष्ट झाले.
चार चांगल्या कामांमागे देशात दुभंग निर्माण करायचा अजेंडा लपून राहू शकला नाही.
परधर्म द्वेषाच्या पायावर कसली डोंबलाची एकता आणणार आहे संघ?
फक्त हिंदू नाही तर पूर्ण देशाची एकता आणणारी काँग्रेस मला कधीही जवळची वाटते.
भारतातील विविधतेचा आदर करीत प्रत्येक जाती ,पंथ ,जमाती , धर्माचा आदर करून प्रेमाने देशाला पुढे नेणारी विचारसरणीच देशाला गरजेची आहे.
आणि या सर्वसमावेशक वीचारसरणीच्या विजयासाठी मी जितके होईल तितके प्रयत्न करणार आहे.
*जय हिंद जय संविधान*