Announcement

Collapse
No announcement yet.

शरद पवार माझ्या नजरेतून

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • शरद पवार माझ्या नजरेतून

    शरद पवार माझ्या नजरेतून
    ---------------------
    मी शरद पवारांना किंवा त्यांच्या कुठल्याही कुटुंबियांना ओळखत नाही भेटलो नाही बोललो नाही. पण तरीही एका त्रयस्थ व्यक्तीबद्दल यासाठी लिहितो आहे कारण ही त्रयस्थ व्यक्ती महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा आणि प्रागतिक राजकारणाचा महत्त्वाचा धागा आहे. पवार व्यक्ती पेक्षा पुरोगामी विचार आणि तसे राजकारण टिकणे महत्त्वाचे आहे..

    पवारांचे संपूर्ण आयुष्याचे मूल्यमापन केले तर त्यांनी पुरोगामी राजकरण केले का ? उत्तर निःसंदिग्ध होच आहे. स्त्रियांना आरक्षण , मंडल आयोग राबवून ओबीसी समाजाला पुढे आणणे,समाजाचा रोष पत्करून सुद्धा आणि राजकीय कारकीर्द पणाला लावून नामांतर करणे , सतत प्रागतिक संस्थांना पाठबळ देणे, सतत शेतकरी कष्टकरी लोकांची मोट बांधणे किंवा सतत सामान्य कुटुंबातून आलेले युवा नेतृत्व हेरणे आणि त्यांना पाठबळ देणे ( राष्ट्रवादीचे अनेक अनेक नेते सामान्य कुटुंबातून आले आहेत.), हे सर्व करताना मराठा समाजाचा रोष पत्करून शिंदे (दलीत) आव्हाड (वंजारी ) असे चांगले नेते पुढे आणणे ही धमक चारित्र्य आणि झेप फक्त आणि फक्त पवार यांच्याकडे च आहे.

    पन्नास वर्षापेक्षा जास्त कारकिर्दीत पवार एक शब्द वावगं बोलत नाहीत. सतत विधायक आणि पुढे नेणारा विचार. आता सुद्धा उद्धव ठाकरेंना विधायक सल्ला दिला की चीन्हात मन गुंतवू नका. जनतेवर विश्वास ठेवा. माझ्या मते हा एक चारित्र्यवान माणसाचा सल्ला आहे. वाया जाणार नाही.

    पवार यांचे आयुष्याचे यश अपयश मोजायला काहीच हरकत नाही..पण एक लक्षात घ्या की ते करताना परिस्थिती चा अंदाज घ्या. मोदींनी शी केली आणि त्यावर पवारांनी विरोध केला नाही याबद्दल पवारांवर टीका करणे न्याय नाही. थोडी टीका मी समजू शकतो पण अवास्तव नको. शेतकरी प्रश्न गहन प्रश्न आहे आणि त्याचे मूळ भ्रष्ट कारकून आणि बनिया व्यापारी यांच्या शेतकरी विरोधी धोरणात आहे. पवार व्यक्ती कडून तुम्ही ही सर्व सिस्टीम बदलण्याची अपेक्षा करता पण त्या सिस्टीम ची धमक बघा की तुमचा गृहमंत्री गुन्हा न केलेला 14 महिने तुरुंगवास भोगून आला. आणि तुम्ही अपेक्षा करता की पवारांनी अमुक का नाही केले तमुक का नाही केले.

    आज परिस्थीत ही आहे की तुमचे 288 आमदार गुलाम आहेत. आज जर राजू शेट्टी आणि कडू सारखे जिगरबाज लोक गप्प आहेत तर कल्पना करा दिल्लीची पाशवी पकड किती घट्ट आहे !आणि तुम्ही अपेक्षा करता की पवार यांव नाही करत आणि त्यांव नाही करत. आज बावनकुळे फडणवीस कदम शेलार चंपा बापट जावडेकर हे सगळे हिजडे नगरसेवक ह्यायाच्या लायकीचे लोक नाहीत पण आमदार खासदार मुख्यमंत्री झाले कारण राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. कसे बदलले. त्याचे उत्तर क्लिष्ट आहे पण थोडाक्यात सांगायचे तर आता मुखावत्याचे राजकरण आले आहे.

    पवार हा त्यांचा शेवटचा शत्रू आहे. आणि या प्रागतिक सम्यक बुद्धीच्या नेत्याचे चारित्र्यहनन मागची 20 वर्षे तरी किमान पद्धत शिर पणे चालू आहे. मी स्वतः पवारांचा विकिपीडिया साधे facts लिहायला गेलो तर गोरी माणसे माझ्यावर तुरून पडली. मित्रानो विकिपीडिया ला साधे सत्य facts का नकोत ? का पावरांबद्दल negative लिहायचे आहे ?

    त्यामुळे पवारांचे शत्रू केवळ देशात नाहीत विदेशात आहेत हे लक्षात घ्या. भारताचे शत्रू देशात आहेत आणि विदेशात आहेत.

    असो पण पवार व्यक्ती महत्त्वाची नाही पण पुरोगामी विचार आणि प्रहातिक राजकरण महत्त्वाचे. त्यामुळे सम्यक विचार करा. मोदी पण पवारांना गुरु मानतात. पण शिष्याचे पाप गुरुला लावू नका.

    लिहिण्यासारखं अजुन खुप आहे ...पण इथे थांबतो .. फक्त एकच शेवटचा मुद्दा .. याच्या पाठीत खंजीर खुपसला त्याच्या पाठीत खंजीर खपासला असली येडपट वक्तव्ये करण्यात अर्थ नाही. राजकारणात कुणी लहान बाळ नसते . आपली टीम तयार करणे न्याय मार्गाने यात काही चूक नाही. पवार born leader आहे. टीम तयार करणारा माणूस आहे रडके भ्रष्ट आणि अकर्तृत्ववान लोक रडतील त्यांना रडू देत. पण ते आरोप बालिश आहेत..

    🙏🙏 चूक भूल देणे घेणे .. आपला हा ग्रुप प्रगल्भ लोकांचा आहे म्हणून धडाधड स्पष्ट लिहिले. कुणाचा उपमर्द करायचा हेतू नाही 🙏🙏​
Working...
X