Announcement

Collapse
No announcement yet.

China

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • China

    असली साम्राज्यवाद विरुद्ध नकली राष्ट्रवाद
    ---------------------------------------------
    भारताचे 20 सैनिक मारले गेल्यावरन चीन विरुद्ध खूप असंतोष आणि चिड निर्माण झाली आहे. चीनचा साम्यवाद साम्राज्यवाद असले शब्द वापरून चीन हा भारताचा मोठा शत्रू आहे त्यापासून भारताला मोठा धोका आहे असे पसरवले जात आहे. खरे सांगायच तर भारताला धोका चीनच्या साम्यवादा पेक्षा आपल्या नकली लोकशाही आणि राष्ट्रवादाचा आहे. कसा ते सांगतो.

    चीन जगात आपलया इतिहासाला स्मरून पुन्हा एकदा श्रीमंत आणि बलशाली होण्याच्या मार्गावर आहे. या मार्गावर ते नुसत्या घोषणा देऊन नाही तर संपूर्ण देश कामाला लावून मागचे 50 वर्षे मार्गक्रमण करत आहेत. भले व्यवस्था समाजवादी असो साम्यवादी असो वस्तुस्थिती ही आहे की झपाट्याने चीन ने आपल्या लोकांचे राहणीमान गरिबीतून श्रीमंतीकडे वळवले आहे. भारतात लोकशाही आणि सध्या राष्ट्रवादाचे मोठे नाटक आहे. केवळ 0.1% भ्रष्ट IAS आणि व्यापारी यांच्या संगनमतातून पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही स्वातंत्र्य आणि समता बाजूला ठेऊन केवळ शोषणावर आधारित आहे. सरकारचे अस्तित्व न्याय आणि लोककल्याणासाठी नाही. सरकारचे अस्तित्व या 0.1% लोकांचे भले करण्यासाठी आहे. भारत कसा आणि कधी श्रीमंत होणार? इथे फक्त चोर व्यापारी श्रीमंत होणार. आणि म्हणून त्या चोर व्यापाऱ्यांना बाकीच्या जगात माल विकता येत नाही. अंबानी जगभर काहीही मूल्यवर्धित वस्तू विकत नाही. कमोडिटी विकतो यातच भारतीय भ्रष्ट व्यापरसंस्थेचा इतिहास वर्तमान आणि भविष्य दिसून येते.

    चीन आपला शेजारी आहे आणि त्यांना हे सगळे दिसते. त्यांना हे सुद्धा दिसते की 1.3 अब्ज लोकांचा देश बनाना रिपब्लिक आहे. चीन भारताला शत्रू किंवा स्पर्धक मानत नाही. चीनच्या दृष्टीने अमेरिका खरा स्पर्धक आहे. आणि भारत अमेरिकेचे प्यादे बानू नये ही त्यांची इच्छा आहे. त्यांचा धटिंगणपणा खरा आहे. परंतु 1947 पासून आजतागायत भारताला आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांशी योग्य संबंध राखण्यात अपयश आले आहे कारण आपले राजकीय किंवा प्रशासकीय राज्यकर्ते इंग्रज धार्जिणे होते. खऱ्या अर्थाने जनतेचे बहुजन वर्गाचे राज्य त्यातल्यातयात महाराष्ट् आणि बंगाल इथे होते. IAS कारकुन वर्ग भ्रष्ट मागास आणि जातीयवादी आहे म्हणून भारत ना आर्थिक दृष्ट्या बलाढ्य आहे ना संरक्षण ना आंतरराष्ट्रीय राजकारणात.

    चीन संयमी आणि वास्तववादी आहे. त्यांनी देशातील जनतेला कार्यप्रवण करून पहिली 40 वर्षे फक्त आर्थिक प्रगती केली.जनतेला केवळ साक्षर नाही तर ज्ञानाकडे वळवले. आज सर्वात जास्त विज्ञान शोधनिबंध चीन मधून प्रकाशित होतात. 40 वर्षे आर्थिक प्रगती केल्यानंतर त्यांनी लक्ष लष्करी प्रगतीकडे वळवले आहे. त्यांचा उद्देश जगात चीनचे स्थान निर्माण करणे आहे. अमेरिकेतील ट्रम्प सारखे नेते सवंग लोकप्रियतेतून आणि तिथले डीप स्टेट चीनच्या उदयाला झेरो सम गेम म्हणून पाहते आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत एक नवे शीतयुद्ध सुरू झाले आहे. भारत या युद्धात पडू नये अशी चीनची इच्छा आहे.इतकेच नाही तर आफ्रिका भारत चीन यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून आपल्या जनतेचे राहणीमान सुधारावे अशी त्यांची धारणा आहे. परंतु भारत अश्या पद्धतीचा विचार करू शकत नाही आणि त्यामुळे भारत हा चीनसाठी न्यूसंस आहे. स्पर्धक मुळीच नाही. त्यांचा लडाख मधील धटिंगणपणा या दृष्टिकोनातून पाहिला तर लक्षात येईल त्याला खरे उत्तर भ्रष्टाचार नष्ट करून स्पर्धा वाढवून श्रीमंत होणे हे आहे. मोदी अशिक्षित मागास आणि भंपक आहे. तो फक्त वेळ मारून नेणार. जोपर्यंत देशात बहुजनांचे राज्य येत नाही तोपर्यंत आपण चीनशी स्वप्नात सुद्धा टक्कर घेऊ शकणार नाही हे वास्तव आहे.
Working...
X