सावरकर जयंती निमित्त त्यांना वंदन. या निमित्ताने मी सावरकरांबद्दल थोडक्यात माझे विचार मांडतो. सावरकर हे प्रखर स्वातंत्र्यवादी होते आणि विज्ञानवादी होते. विज्ञानवादाबरोबर येणारा सुधारकांचा पिंड हि त्यांच्या कडे होता. सुंदर कवी होते. त्यांची "सागरा प्राण तळमळला" आणि "जयोस्तुत श्री महन्मंगले" ही दोन गीते जितके प्रखर देशभक्तीची तितकीच भावून देखील आहेत. छत्रपतींवर त्यांनी "हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" अशी अप्रतिम कविता वयाच्या ९व्या वर्षी लिहिली. टिळकांना विश्वास बसला नाही कि इतका लहान मुलगा अशी कविता लिहू शकतो. बक्षीस देताना त्यांनी सावरकरांना विचारले कि खरेच तू हि कविता लिहिली आहेस का ? त्यावर सावरकर म्हणाले जर १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर मी ही कविता का नाही लिहू शकणार. (अश्याप्रकारे लहान वयात सावरकर पुणेकर झाले ). सावरकरांनी मराठी भाषेला अनेक सुंदर शब्द देखील दिले. मेअर साठी महापौर हा शब्द त्यांनी निर्माण केला. पूर म्हणजे गाव किंवा शहर. तिथे राहणारा पौर. आणि पहिला तो महापौर.
या झाल्या चांगल्या बाबी. सावरकरांचा दडवलेला, अनुल्लेखित, आणि अनुत्तरित इतिहास देखील आहे. त्याबद्दल थोडे बोलू. सावरकरांच्या इतिहासाची किमान ४ पाने अशी आहेत.ती पाने आधी लिहितो आणि त्यानंतर त्याचे विश्लेषण करतो.
१) सावरकर इंग्लंड ला गेले ते श्यामजी कृष्ण वर्मा याच्या मुळे. परंतु त्यांची भेट कशी कधीच कुठे आणि का झाली आणि सावरकरांवरच त्याने मेहेरबानी का केली इतक्या लहान वयात ते कळत नाही. हा वर्मा खरे तर वर्मा नव्हता. ते त्याचे खोटे नाव. खरे नाव कृष्णदास भानुशाली. हा एक गुजराती बनिया होता. त्याच्या बद्दल खूप माहिती नाही. पण एक नक्की कि हा माणूस अचानक श्रीमंत झाला इतका कि इंग्लंड मध्ये सुद्धा त्याच्या सारखे कमी लोक होते. तिथे त्याने क्रांतीकारकांना पैसे पुरवले आणि राहण्याची व्यवस्था केली. त्यापैकी सावरकर एक. इंग्रजांच्या नाकाखाली एक व्यापारी माणूस इतकी रिस्क घेऊन त्यांच्या विरुद्ध काही करेल याची शक्यता माझ्या मते शून्य आहे.
२) सावरकरांना जन्मठेप झाल्या नंतर सावरकरानि रीतसर माफी मागणारी अनेक पत्रे लिहिली आणि सुटका करून घेतली. हे निर्विवाद सत्य आहे. अर्थात अंदमान म्हणजे काही ५ स्टार हॉटेल नव्हते. त्यामुळे हाल अपेष्टाना कंटाळून माफी मागणे हा माझ्या मते नैसर्गिक आहे. त्यात देशद्रोह नाही.
3) इंग्रजांनी सावरकरांची केवळ सुटकाच नाही केली तर त्यांना महिन्याला ६० रुपये पगार दिला. सुटकेच्या आणि पैश्याच्या बदल्यात इंग्रजांना काय दिले सावरकरानि ? विचार करा. दरम्यान सुटका झाल्यावर लगेच सावरकर आणि हेडगेवार यांची भेट झाली आणि १९२५ मध्ये RSS ची स्थापना झाली. पुढे सावरकरांनी पहिल्यांदा द्विराष्ट्रवाद मांडला आणि भारताची फाळणी झाली. सावरकर हेच द्विराष्ट्रवादाचे जनक आहेत.
४) भारताची फाळणी झाली याचा राग धरून RSS आणि हिंदू महासभेचा कार्यकर्ता नथुराम गोडसे याने गांधीजिची हत्या केली. फाळणीला गांधी यांच्या पेक्षा नेहेरु आणि काँग्रेस चे इतर नेते जास्त जबाबदार असता गांधीजींची हत्या का करावी हे एक गूढ आहे. सावरकरांचा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे अनेक पुरावे असूनही त्यांना आणि RSS दोघांना निर्दोष सोडवले गेले. भारतीय न्यायव्यवस्था तेव्हापासून आजतागायत न्यायव्यवस्था कमी आणि अन्याय व्यवस्था जास्त आहे.
ही चार पाने आज पर्यंत एकत्रितपणे कोणी पहिली नाहीत किंवा त्यावर विचार केला नाही. मला वाटते तसे करण्याची गरज आहे. त्यातून माझ्या मते खालील चित्र स्पष्ट होते.
इंग्रजांनी १८५७ नंतर भारतावर पकड घेण्यासाठी अनेक तंत्रे अवलंबली.
१) हिंदू मुस्लिम यांच्यात वितुष्ट निर्माण करणे
२) काँग्रेस पक्ष स्थापन करून भारतीय असंतोष ताब्यात ठेवणे
३) भारतीय प्रशासकीय सेवा निर्माण करून त्यात मुख्यतः ब्राह्मण कायस्थ या लोकांना स्थान देणे.
४) संस्थाने खालसा करणे आणि क्षत्रिय समाजाला खच्ची करणे
यापैकी #३ चा भाग म्हणून इंग्रजांनी अनेक भारतीयांना इंग्लंड मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी नेले. या मध्ये क्षत्रिय नावाला सुद्धा सापडत नाहीत. बहुतेक ब्राह्मण किंवा बनिया होते (गांधीजी सुद्धा) . त्यातील बहुतांश लोकांनी इमाने इतबारे इंग्रजी साम्राज्याची सेवा केली. परंतु सावरकर त्याला अपवाद ठरले आणि सशस्त्र क्रांती चा मार्ग त्यांनी स्वीकारला. पण त्यांचा शास्त्रे आणि पैसे पुरवणारा श्यामजी कृष्ण वर्मा हाच मुळी इंग्रजांचा हेर होता आणि त्यामुळे इंग्रजांनी सावरकरांना अटक करून अशी कडक जन्मठेपेची शिक्षा केली कि दुसर्यांनी पुन्हा सावरकरांचे अनुकरण करू नये. अखेरीस तुरुंगातील हाल अपेष्टा, कुटुंबांच्या हाल अपेष्टांमुळे सावरकरांचा निग्रह ढळला आणि त्यांनी इंग्रजांकडे क्षमायाचना केली. इंग्रजांनी अनेक वर्षांनी त्यांची मागणी मान्य केली पण सावरकरांना स्थानबद्धतेत ठेऊन पगार देऊन हिंदुत्वाची बीजे रोवली. हिंदुत्वाचा जन्मच भारत देशाची धर्माच्या आधारावर फाळणी करण्यासाठी झाला आहे. जसे अमेरिकेने रशियाविरुद्ध इस्लाम धर्म वापरून तालिबान निर्माण केले त्यापद्धतीने इंग्रजांनी सनातनी लोकांना पकडून हिंदुत्वाला सावरकरांमार्फत चिथावणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर RSS ची स्थापना झाली आणि त्यांचा गणवेश काठ्या लष्करी कवायती हे सर्व पद्धतशीर इंग्रजांचा ब्राह्मण समाजावर असलेला पगडा दाखवतात. एका बाजूने काँग्रेस, दुसऱ्या बाजूने प्रशासकीय व्यवस्था, तिसऱ्या बाजूने सनातनी धर्मवेडे हिंदुत्व आणि चौथ्या आणि गुप्त पद्धतीने श्यामजी कृष्ण वर्मा सारखा हेर वापरून क्रांतीकारकांवर लक्ष ठेवणे अशी इंग्रजांची भारत ताब्यात ठेवण्याची चोख व्यवस्था होती त्याची दाद द्यायला हवी.
दुर्दैवाने सावरकर कितीही देशभक्त असले तरीही इंग्रजांनी त्यांना भरपूर वापरून घेतले आणि त्याचा देशावर दुष्परिणाम होऊन भारताच्या फाळणीची बीजे सावरकरांकडूनच रोवली गेली. सावरकर कितीही देशभक्त असले तरीही त्यांचा गांधी द्वेष हा त्यांचा हिणकस पणा दाखवतो. देशाची फाळणी हि गांधीजींमुळे नाही झाली तर मवाळ काँग्रेस आणि जहाल हिंदुत्ववादी या दोन्ही मध्ये असलेल्या ब्राह्मण व्यक्तींमुळे झाली आहे. इंग्रजांनी देश मराठा आणि मुस्लिम या दोन राज्यकर्त्यांकडून घेतला. देश चालवण्यासाठी त्यांनी मुख्यतः ब्राह्मण आणि काही प्रमाणात कायस्थ लोक वापरले. आणि देश सोडून जाताना मात्र त्याच लोकांच्या हातात देश राहील याची व्यवस्था त्यांनी सुद्धा केली आणि प्रशासन आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी सुद्धा त्याची पुरेपूर काळजी घेतली. इंग्रजांनंतर मुस्लिम परत देशाचा ताबा घेतील या भीतीने काँग्रेसने फाळणी ला विरोध केला नाही (किंबहुना त्यांना तेच हवे होते). जहाल हिंदुत्ववाद्यांनी (अर्थात सावरकरानि) धर्माधिष्टीत द्विराष्ट्रवाद मांडून फाळणी ची बीजे च रोवली. यात गांधीजींना कुठेच सहभाग नव्हता. परंतु तरीही हिंदुत्ववाद्यांनी गांधी या बनिया माणसाला मारले. बनिया म्हणजे OBC देशाचा नेता होऊच कसा शकतो हा जातीयवादी द्वेषच त्यातून दिसून येतो.
माझी हि मांडणी कच्ची आहे. कारण मी इतिहास संशोधक नाही. परंतु अस्पष्ट घटना यांचा एकत्रित पाने मागोवा घेऊन हे चित्र मला तरी स्पष्ट दिसते. विशेषतः अमेरिकेत २० वर्षे राहून यशस्वी साम्राज्ये कशी चालवली जातात - शत्रूच्या च्या गोटात ते कशी अस्थिरता माजवून स्वगृही स्थिरता निर्माण करून आपला स्वार्थ साधतात - याचे आहे तसे निरीक्षण मी बरीच वर्षे करतो आहे. इंग्रजांच्या कूट नीतीला सावरकर काँग्रेस कसे बळी पडले. आणि काँग्रेस ने पुरावे असूनही सावरकर आणि RSS यांना का सोडले याचे उत्तर यात आहे कि सावरकर आणि काँग्रेस आणि सनातनी आणि IAS ही सर्व इंग्रजांची पिल्ले. एखाद दुसरे बंडखोर निघाले. पण त्यामुळे ते सर्व एकमेकांना सांभाळून घेतात. भारत देशाचे दुर्दैव असे कि भारतात खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य ७३ वर्षांनंतर अजूनही आले नाही. अजूनही भारत देशात क्षात्र वृत्ती निर्माण झाली नाही आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य नाही खऱ्या अर्थाने न्याय नाही.
सावरकर इंग्रजांकडून खेळवले गेले तरीही त्यांच्या देशभक्तीला आणि बंडखोरीला वंदन. भारतीय समाज मन इतिहास आहे तसा डोळसपणे बघायला शिको आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्य आणि न्याय प्रस्थापीत करून प्रगत बनो अशी प्रार्थना.